- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांची 'ईडी'कडून चौकशी
- महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तनपुरे यांची ईडीकडून चौकशी
- महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक मध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला होता
- साखर कारखान्यांना कर्ज न दिल्याने जप्त केलेले कारखाने विकले होते
- अहमदनगर मधील प्राजक्त तनपुरे यांनी खरेदी केलेल्या कारखान्याचा देखील यात समावेश
- तानपुरे यांनी 26 कोटींचा कारखाना 13 कोटी रुपयांत खरेदी केल्याची चर्चा
- संशयास्पद व्यवहार झाला असल्याने ईडीची चौकशी
Breaking - ओबीसी प्रवर्गातील जागांवरील निवडणुकीला स्थगिती, निवडणूक आयोगाचा निर्णय - Breaking news etv marathi
20:41 December 07
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांची 'ईडी'कडून चौकशी
18:42 December 07
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीकडून 6 तास चौकशी
- मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीकडून 6 तास चौकशी
- अनिल देशमुख प्रकरणात झाली चौकशी
- सिताराम कुंटे सायंकाळी ईडी कार्यालयात बाहेर निघाले
18:04 December 07
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, काही कर्मचारी कामावर रुजू
- नागपूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, काही कर्मचारी कामावर रुजू
- नागपूरच्या गणेशपेठ अगरातून आज १३ बसेच्या २६ फेऱ्या झाल्या
- यापैकी १२ फेऱ्या जिल्ह्यातील आगारात तर एक फेरी आंतरजिल्हा(भंडारा) येथे झाली
- उद्या पासून आणखी काही कर्मचारी कामावर परत येण्याची शक्यता
17:51 December 07
पुणे विमानतळावर जवळपास 30,000 प्रवाशांची तपासणी
पुणे - विमानतळावर कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत
पुणे विमानतळावर जवळपास 30,000 प्रवाशांची तपासणी करण्यात आली
त्यापैकी 10 जणांची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे
16:30 December 07
ओबीसी प्रवर्गातील जागांवरील निवडणुकीला स्थगिती, निवडणूक आयोगाचा निर्णय
- मुंबई - ओबीसी प्रवर्गातील जागांवरील निवडणुकीला स्थगिती
- राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे
- ओबीसी जागांवरील निवडणूक स्थगितीचे पत्रक आयोगाने काढले
- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
- चारशे जागांवरील निवडणुकीला मिळणार स्थगिती
16:12 December 07
वानखेडे V/S मलिक : प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे नवाब मलिकांना उच्च न्यायालयाचे आदेश
- मुंबई - नामदेव वानखडे यांनी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली
- मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
- शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे मलिक यांना आदेश देण्यात आले
14:06 December 07
मंत्री आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख माडवीय यांना पत्र
मुंबई - पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख माडवीय यांना पत्र
राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असताना ओमायक्रॉनचा धोका वर्तवला जातो आहे
त्यामुळे फ्रन्टलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस द्या
लसीकरणाचा आकडा वाढवण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 15 पर्यंत आणावी
दोन डोसमधील अंतर किमान चार आठवड्यांपर्यंत करावे, जेणेकरून सर्वांना लसीकरण करणे सोयीस्कर होईल
13:39 December 07
खा. संजय राऊत आज खा. राहुल गांधींना भेटणार
शिवसेना नेते संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेणार आहेत.
12:29 December 07
खासदार निलंबनाविरुद्धच्या आंदोलनात शरद पवार यांची उपस्थिती
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन यांनी आज संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ 12 निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी खा. संजय राऊत आणि खा. प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.
12:11 December 07
शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेर दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
Shirdi Flash
शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेर दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद करावी ही मागणी घेऊन शिर्डीकरांनी टाकला होता निवडणुकीवर बहिष्कार
दुसरीकडे 2 डिसेंबरला शासनानेही नंगरपंचायतीची नगर परिषद करण्याची काढली होती अधिसूचना
नगरपरिषद करण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने आणि पुढील काही महिन्यातच पुन्हा नगरपरिषदेची निवडणूक लागणार असल्याने कोणीही फॉर्म भरु नये यासाठी ग्रामस्थ करत होते प्रयत्न
11:56 December 07
सुधा भारद्वाज यांना डिफॉल्ट जामीन देण्याला आव्हान देणारी NIA ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या वकिल-कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना डिफॉल्ट जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राष्ट्रीय तपास संस्थेची (NIA) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
11:36 December 07
सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल
महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि मुख्य सल्लागार सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल
अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले होते
10:42 December 07
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल
मुंबई फ्लॅश
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल
याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत
याप्रकरणी मुंबई पोलीस मुख्यालयात शिवसेनेचे शिष्टमंडळ तक्रार दाखल करण्यासाठी आज विश्वास नांगरे पाटील यांची 3.30 वा भेट घेणार आहेत
विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी आणि मुंबई महिला विभाग प्रमुख पाटील यांची भेट घेणार
अशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेणार
10:30 December 07
ज्ञानदेव वानखेडे यांचे मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नवाब मलिक यांनी न्यायालयात शपथपत्र देऊनही त्यांच्या कुटुंबाविरुद्ध विधाने करून न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
09:07 December 07
नागपूर - महिलेच्या घरी छापा टाकून 12 हजार लिटर चोरीचे पेट्रोल जप्त
नागपूर फ्लॅश
शहरातील अजनी पोलिसांच्या एका पथकाने शहराच्या सीमेवर असलेल्या खापरी गावात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी छापा टाकून 12 हजार लिटर चोरीचे पेट्रोल जप्त केले आहे.
एकप्रकारे मिनी पेट्रोल पंपच या महिलेने आपल्या घरी तयार केला होता.
पेट्रोलियम डेपोमधून निघालेल्या टँकरमधून काही प्रमाणात पेट्रोल या महिलेला घरी रिकामे केल्यानंतर टँकर पुढच्या प्रवासाला जात असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती.
ज्याच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांना अटक केली आहे.
08:18 December 07
बीजिंगमधील हिवाळी ऑलिंपिकवर अमेरिकेचा बहिष्कार
अमेरिकेने 2022 हिवाळ्यातील ऑलिंपिकवर बहिष्काराची घोषणा केली
चीनच्या "शिनजियांगमध्ये सुरू असलेल्या नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा" प्रतिकात्मक निषेध म्हणून हा बहिष्काराचा निर्णय
बिडेन प्रशासनाने बीजिंगमध्ये 2022 हिवाळी ऑलिम्पिकमध्ये अधिकृत यूएस शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे
व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन यांनी ही माहिती दिली
06:22 December 07
Breaking - मीरा रोड रेल्वे ट्रॅकजवळ जवानाचा मृतदेह सापडला
मुंबई - येथे मीरा रोड रेल्वे ट्रॅकजवळ काल एका जवानाचा मृतदेह सापडला होता. ३० नोव्हेंबरपासून तो बेपत्ता होता. पुढील तपास सुरू असल्याचे वसई पोलिसांनी सांगितले आहे.
06:10 December 07
Breaking - छायाचित्रांची भीती दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्याला दिल्लीतून अटक
मुंबई - आपल्या पत्नीच्या वैयक्तिक छायाचित्रांचा संदर्भ देऊन ब्लॅकमेल करत आहे. तसेच, त्याच्याकडून 8 लाख रुपयांची मागणीही होत आहे. अशी तक्रार आम्हाला एका व्यक्तीकडून मिळाली. आम्ही त्याच्यावर कारवाई करत त्याला दिल्लीतून अटक केली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांनी दिली आहे.