चेन्नई: तामिळनाडू सरकार लवकरच सरकारी शाळांमधील इयत्ता 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता देणार ( Tamil Nadu rolls out Chief Ministers Breakfast Scheme ) आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin )यांनी बुधवारी ही घोषणा केली. सरकारी शाळेत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ते सकाळचा नाश्ता सोडून शाळेत येत असल्याने सरकारने सरकारी शाळांमध्ये नाश्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॅलिन म्हणाले की, या प्रकल्पाच्या सरकारी आदेशावर त्यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली. ( Chief Ministers Breakfast Scheme )
मानसिक, शारीरिक आरोग्य महत्त्वाचे :सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यास सुरुवात करणारे तामिळनाडू हे पहिले राज्य होते. स्टॅलिन म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही महत्त्वाचे असून, आत्मविश्वास असेल तर अभ्यासात कोणतीही अडचण येत नाही.
बुधवारी आदेश जारी :सीएम स्टॅलिन यांनी या वर्षी 7 मे रोजी तामिळनाडू विधानसभेत घोषणा केली होती की सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1 ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जाईल. पहिल्या टप्प्यात काही नगरपालिका आणि दुर्गम ग्रामीण भागात ही योजना राबवण्यात येणार असल्याचे स्टॅलिन यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (२७ जुलै) शासन आदेश जारी करण्यात आला आहे.