महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shivaji Maharaj : आनंदाची बातमी ; लाल किल्ल्यावर 'राजा शिवछत्रपती' नाटकाचे पाहता येणार मोफत प्रयोग - Staged At Red Fort In Delhi Till November 6

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Shivaji Maharaj ) शौर्यावर आधारित नाटक दिल्लीतील लाल किल्ल्यावर रंगणार आहे. 'राजा शिवछत्रपती' ( Raja Shivchhatrapati drama ) नावाच्या या नाटकाचे आतापर्यंत अनेक देशांमध्ये हजाराहून अधिक शो झाले आहेत. या नाटकात अडीचशेहून अधिक कलावंतांचा सहभाग आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत हे नाटक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येईल.

Shivaji Maharaj
शिवाजी महाराजांचे शौर्य गाजवले जाणार

By

Published : Nov 3, 2022, 11:29 AM IST

नवी दिल्ली : नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाल किल्ल्यावरून सुरू झालेल्या शिवाजी महाराजांच्या ( Shivaji Maharaj ) शौर्यावर आधारित नाटक त्यांना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या सादरीकरणासाठी चार मजली स्टेज बांधण्यात आला आहे. या भव्य रंगमंचावर हे भव्य नाटक रंगणार आहे.

नाटकात एकूण 250 कलावंतांचा सहभाग आहे. तर ६ नोव्हेंबरपर्यंत रंगणारे 'राजा शिवछत्रपती' हे नाटक ( Raja Shivchhatrapati drama ) प्रेक्षकांना पाहता येईल. या नाटकाला एक उत्तम रंगमंच लाभला असून लाईट, साऊंड इफेक्ट्ससह युद्धाची दृश्ये या नाटकाला आणखी भव्य बनवत आहेत. नाटकात घोड्यावर स्वार झालेली फौज नाट्यप्रेमींना रोमांचित करणार आहे.

जगभरात 1000 हून अधिक शो : राजा शिवछत्रपती महानाट्य आयोजन समितीच्या पुढाकाराने लाल किल्ल्यावर हे नाटक 6 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. 'राजा शिवछत्रपती' या नाटकाचे भारत, अमेरिका, इंग्लंडसह जगभरात एक हजाराहून अधिक शो झाले आहेत, असे समितीच्या एका सदस्याने सांगितले. १७ व्या शतकातील सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित हे नाटक ६ नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ५.३० वाजता लाल किल्ला मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे नाटकात शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र मांडले आहे. नाटकात 250 कलाकार आहेत. तसेच घोडे, हत्ती, उंट हेही नाटकाचा भाग आहेत.

प्रेक्षकांना विनामूल्य नाटक पाहता येणार :'राजा शिवछत्रपती' नावाच्या या नाटकाचे आतापर्यंत अनेक देशांमध्ये हजाराहून अधिक शो झाले आहेत. या नाटकात अडीचशेहून अधिक कलावंतांचा सहभाग आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत हे नाटक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details