लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका खासगी रुग्णालयात 'ब्रेन डेड' घोषित करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणाने ( Brain-dead young man ) तीन रुग्णांना नवे जीवन दिले ( Brain-dead young man gave new life to three people ) आहे. कुटुंबीयांच्या संमतीने रुग्णाचे अवयव दान करण्यात आले आहे. 'ब्रेन-डेड' ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्तीचा मेंदू काम करणे बंद करतो.
डॉक्टरांनी घोषित केले ब्रेन डेड :लखनौमध्ये राहणारा एक 21 वर्षीय तरुण अपघाताचा बळी ठरला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना अपोलो मेडिक्स रुग्णालयात दाखल केले. रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. तपासणीत डॉक्टरांनी तरुणाला ब्रेनडेड घोषित केले. कुटुंबीयांच्या संमतीने तरुणाचे अवयवदान करण्यात आले. तरुणाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन मिळाले आहे.
दोन मूत्रपिंड, एक यकृत दान : अपोलो मेडिक्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला 9 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 10 मे रोजी डॉक्टरांनी तरुणाच्या मृतदेहाची तपासणी सुरू केली. तपासात डॉक्टरांना हा तरुण ब्रेन डेड झाल्याचे आढळून आले. कुटुंबीयांना सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यांच्या परवानगीने 11 मे रोजी तरुणाच्या दोन किडनी आणि एक यकृत काढून इतर रुग्णांचे प्राण वाचले.