महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2020, 7:38 PM IST

ETV Bharat / bharat

रेल्वेवर चढून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात 15 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. गणेश्वर असे या 15 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो राज्य सरकारच्या गुणवत्ता निरीक्षकांचा मुलगा होता. तो येथील रेल्वे जंक्शन येथे मालगाडीने वाहतूक केलेल्या अन्नधान्यांची तपासणी करीत होता. तो वडिलांसोबत या ठिकाणी गेला होता. गणेश्वर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रेनवर चढला. तो सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना तारेला चिकटल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला.

तामिळनाडू सेल्फीच्या प्रयत्नात मृत्यू न्यूज
तामिळनाडू सेल्फीच्या प्रयत्नात मृत्यू न्यूज

तिरुनेलवेली (तामिळनाडू) - मालगाडीच्या इंजिनवर चढून सेल्फी क्लिक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 15 वर्षीय मुलाचा उच्च दाबाच्या विद्युत तारेचा झटका बसून मृत्यू झाला. गुरुवारी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -तामिळनाडूत 50 फूट खोल विहरीमध्ये पडली हत्तीण; बचावकार्य सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. गणेश्वर असे या 15 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो राज्य सरकारच्या गुणवत्ता निरीक्षकांचा मुलगा होता. तो येथील रेल्वे जंक्शन येथे मालगाडीने वाहतूक केलेल्या अन्नधान्यांची तपासणी करीत होता. तो वडिलांसोबत या ठिकाणी गेला होता.

गणेश्वर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रेनवर चढला. तो सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना विजेच्या तारांकडे लक्ष न गेल्यामुळे तारेला चिकटल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला.

या उघड्या तारेतून 25 हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह वाहात होता. मुलगा या तारेच्या थेट संपर्कात आल्याने तो जागीच मरण पावला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

हेही वाचा -काय सांगता! केरळात 'कोरोना' नावाचे दुकान, महामारीच्या 7 वर्षांआधी ठेवले होते नाव

ABOUT THE AUTHOR

...view details