नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ( British Prime Minister Boris Johnson India Visit )दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ब्रिटन आणि भारतातील धोरणात्मक संरक्षण, राजनैतिक आणि आर्थिक भागीदारी यावर सखोल चर्चा करणार आहेत. याच्यामागील भारत आणि ब्रिटनमधील घनिष्ठ भागीदारी वाढवणे आणि इंडो-पॅसिफिकमध्ये सुरक्षा सहकार्याचे पाऊल उचलणे आहे हा मुख्य उद्देश आहे.
बोरिस जॉन्सन गुरुवारी उशिरा दिल्लीत पोहोचले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ( Union Minister Rajeev Chandrasekhar ) यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. जॉन्सनचे राष्ट्रपती भवनात ( Rashtrapati Bhawan ) भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीलाही भेट देऊन पुष्पहार अर्पण केला.
परराष्ट्र मंत्र्यांशी करणार चर्चा
यूकेचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस जयशंकर ( External Affairs Minister (EAM) S Jaishankar ) यांच्याशीही चर्चा करतील. दुपारी, हैदराबाद हाऊस येथे दुपारी एक वाजता दोन्ही पक्ष एक प्रेस निवेदन जारी करतील. दोन दिवसांच्या भारत दौऱ्याच्या प्रारंभासाठी जॉन्सन गुरुवारी गुजरातमध्ये दाखल झाले. ब्रिटिश उच्चायोगाने दिलेल्या निवेदनानुसार, जॉन्सन यंदा मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघटीसंदर्बाच चर्चा करतील. यामुळे भारत यूकेच्या एकूण व्यापारात दरवर्षी 28 अब्ज पौंडांपर्यंत वाढ होईल. 2035 पर्यंत संपूर्ण यूकेमधील उत्पन्न 3 अब्ज पौंडांपर्यंत वाढेल.