महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीमावाद : मिझोरम पोलिसांकडून आसाम मुख्यमंत्र्यांसह 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मिझोरमचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस जॉन नेईहलेईआ यांनी पत्रकार परिषदेत गुन्हा नोंदविल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री हिंमत विश्व सर्मा आणि सहा अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. हा गुन्हा वैरेन्गटे येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे.

Assam Chief Minister Himanta Biswa Sarma
Assam Chief Minister Himanta Biswa Sarma

By

Published : Jul 31, 2021, 7:24 PM IST

गुवाहाटी-मिझोरम-आसाममधील सीमावादाला नवीन वळण लागले आहे. मिझोरमच्या पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिंमत विश्व सर्मा, चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्यात हिंसाचार झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

मिझोरमचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस जॉन नेईहलेईआ यांनी पत्रकार परिषदेत गुन्हा नोंदविल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री हिंमत विश्व सर्मा आणि सहा अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. हा गुन्हा वैरेन्गटे येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा-जम्मू काश्मीर : पुलवामाच्या हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी एन्काउन्टरमध्ये ठार

यांच्यावर गुन्हे दाखल-

आयजीपी अनुराग अग्रवाल, डीआयजी देवज्योती मुखर्जी, काशरचे एसपी चंद्रकांत निंबाळकर आणि ढोलाई पोलीस स्टेशनचे इनचार्ज अधिकारी साहब उद्दीन या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. काशरचे उपायुक्त कीर्ती जल्ली आणि काशरचे विभागीय वनाधिकारी सन्नीदेव चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळख पटू न शकलेल्या आसामच्या 20 पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे.

हेही वाचा-रुग्णालयाचा बेजबाबदारपणा, अर्धांगवायूने त्रासलेल्या रुग्णाच्या चेहऱ्याला लागल्या मुंग्या

काय घडली आहे घटना-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांनी सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर पुन्हा हिंसाचार भडकला. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा ट्विटरवार (Twitter) पाहायला मिळाला. विशेष म्हणजे दोघांनीही अमित शहा यांना आपापल्या ट्विट पोस्टमध्ये टॅग केले. हिंसाचाराचा व्हिडिओ ट्विट करत मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी गृहमंत्री शहा यांना हस्तक्षेप करण्याच्या मागणीची पोस्ट केली आहे. 'हे आता थांबवण्याची गरज आहे. घटनेमध्ये आसामच्या कछारच्या रस्त्यावरुन मिझोरमला परतणाऱ्या दाम्पत्यासोबत स्थानिक गुंडांनी मारहाण केली. आपण या हिंसक कृत्याला कसा न्याय देऊ शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details