डेहराडून (उत्तराखंड): उत्तराखंड पोलिसांनी खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्याबाबत अलर्ट जारी केला आहे. अमृतपाल सिंग उत्तराखंडमार्गे नेपाळला पळून जाण्याची भीती आहे. पंजाब पोलिसांच्या या माहितीच्या आधारे उत्तराखंड पोलिसांनी राज्याच्या सीमांवर तपासणी मोहीम तीव्र केली आहे. तर, हे लक्षात घेऊन अटकेची जबाबदारीही एसटीएफकडे देण्यात आली आहे. यासोबतच उत्तराखंडच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत.
अलर्ट जारी करून दक्षता वाढवली :वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला फरार घोषित केल्यानंतर आता केवळ पंजाबच नाही तर हरियाणा आणि उत्तराखंडच्या पोलिसांनीही अलर्ट जारी केला आहे. अमृतपाल उत्तराखंडमार्गे नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी माहिती आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांच्या माहितीवरून उत्तराखंड पोलिसांनी अलर्ट जारी करून अतिरिक्त दक्षता वाढवली आहे.
उत्तरप्रदेश सीमेवरही पोलिसांची नजर :मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ सीमेसोबतच हिमाचल सीमेवरही तपासणी मोहीम वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर उत्तर प्रदेश सीमेवरही पोलिसांची नजर आहे. मोठी बाब म्हणजे अमृतपाल सिंग गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. यासाठी पंजाब पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. पंजाब पोलिसांना अमृतपाल सिंगशी संबंधित अनेक माहिती मिळत आहे. यामध्ये एक इनपुट असाही आहे की, अमृतपाल सिंगला नेपाळला पळायचे आहे आणि त्यासाठी तो उत्तराखंडचा मार्ग स्वीकारू शकतो. या माहितीच्या आधारे राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.