महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाम-मिझोरम सीमेवर गोळीबारात 6 जवान ठार

आसाम-मिझोरम दरम्यानच्या विवादित सीमा भागात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला. याबाबत ट्विटरवरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाला.

आसाम-मिझोरम सीमेवर गोळीबारात 6 जवान ठार
आसाम-मिझोरम सीमेवर गोळीबारात 6 जवान ठार

By

Published : Jul 26, 2021, 8:53 PM IST

Updated : Jul 26, 2021, 9:07 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांनी सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर पुन्हा हिंसाचार भडकला. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे.

घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा ट्विटरवार (Twitter) पाहायला मिळाला. विशेष म्हणजे दोघांनीही अमित शहा यांना आपापल्या ट्विट पोस्टमध्ये टॅग केले. हिंसाचाराचा व्हिडिओ ट्विट करत मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी गृहमंत्री शहा यांना हस्तक्षेप करण्याच्या मागणीची पोस्ट केली आहे. 'हे आता थांबवण्याची गरज आहे. घटनेमध्ये आसामच्या कछारच्या रस्त्यावरुन मिझोरमला परतणाऱ्या दाम्पत्यासोबत स्थानिक गुंडांनी मारहाण केली. आपण या हिंसक कृत्याला कसा न्याय देऊ शकता.'

याला प्रत्युत्तर देत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी ट्विट केले आहे. 'माननीय @ZoramthangaCM जी, कोलासिब (मिझोरम) के एसपी आम्हाला आमच्या पदावरून पायउतार होण्यास सांगत आहेत. तोपर्यंत त्यांचे ना ऐकणार ना हिंसाचार थांबवणार. अशा परिस्थितीत आपण सरकार कसे चालवू शकतो? आशा आहे की आपण लवकरात लवकर हस्तक्षेप कराल.'

Last Updated : Jul 26, 2021, 9:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details