पटना:कोरोनाच्या ओमायक्रॉन (New Variant of Corona Omicron) या नव्या व्हेरियंटने जगभराची चिंता वाढवली आहे. ज्या देशात ओमायक्रॉनचे नवे रूग्ण समोर येत आहेत, तेथे लसीचे दोन डोस घेतलेले लोकही संक्रमित होताना दिसत आहेत. सुक्ष्मजीवशास्त्रातील तज्ञ यावर उपाय म्हणुन (Booster Dose of Corona Vaccine) बूस्टर डोस देण्याची मागणी करत आहेत. त्यांनी म्हणले आहे की, ज्यांनी खुप दिवसांपुर्वी (Both doses of Corona Vaccine) लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना बुस्टर डोस द्यायला सुरवात करायला हवी.
सुचनांचे गंभिरतेने पालन हवे
तज्ञांनी म्हणले आहे की, आपल्या देशात कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले लोक स्वत:ला खुप सुरक्षित मानत असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नाहीत. पण प्रत्येकाने या सूचना पाळायलाच हव्यात. मास्कच्या वापरा सोबतच हात सॅनिटाईज करणे खुप आवश्यक आहे. पटना मेडीकल काॅलेज (PMCH) च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील तज्ञ डॉ. सत्येंद्र नारायण सिंह म्हणले आहे की, कोरोना लसीकरणाची सुरवात 16 जानेवारी पासून झाली. सुरवातीला 28 दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जात होता. आता या लोकांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तर ते जास्त फायदेशीर
कोणतीही लस घेतल्यानंतर त्याची एंटीबॉडी तीन महीने शिखरावर असते. लस घेतल्यानंतर एंटीबॉडी तयार व्हायला सुरवात होते, पण 14 दिवसानंतर ती हळूहळू रक्तात येते. लसीकरण सुरू झाल्यावर दोन लसींमधील अंतर वाढवून सुमारे 3 महिने करण्यात आले. एंटीबॉडी शिखरावर असताना दुसरा डोस देऊन एंटीबॉडी आणखी वाढवली जात होती. पण कोणतीही लस देऊन तयार केलेली एंटीबॉडी सहा महिण्यानंतर कमी व्हायला लागते. आणि साधारण 9 ते 10 महिण्यानंतर एंटीबॉडीचा स्तर कमी होऊन शून्यावर चालला जातो. लसीरणामुळे शरीरातील टी सेल मधे मेमरी स्टोअर होते. ज्यांची नंतर रोगाशी लढण्यासाठी खुप मदत होते. पण त्यासाठी बूस्टर डोस दिला तर ते जास्त फायदेशीर राहील.
9 महिण्यानंतर घेता येतो डोस
कोरोनाचा नवा स्ट्रेन (New Strain of Corona) ओमायक्रॉन बद्दल असे पहायला मिळते की तो वेगाने संक्रमीत होतो आहे.त्यामुळे ज्यांच्या शरीरातील एंटीबाॅडी कमी होत आहेत त्यांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे. नियमानुसार लस घेतल्यानंतर 12 महिन्यांनंतरच बुस्टर डोस घेतला जावा. पण 9 महिण्यानंतर हा डोस घेता येतो. बूस्टर डोस साठी कोणत्याही कंपनीची लस घेता येऊ शकते, ती सुरक्षित आहे. कोणत्याही कंपनीची लस घेतली असेल तरी कोणत्याही कंपनीचा डोस घेतल्यामुळे कोणताही अपाय होत नाही हे अनेक चाचण्यांनी सिध्द झालेले आहे.