नवी दिल्ली- मुलांकरिता आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पात्र असलेलेले मुले आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर तीन महिन्यापर्यंत लस मिळू ( COVID 19 vaccination new rule for children ) शकणार नाही. याबाबतचे आदेश आरोग्य मंत्रालयाने काढले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील ( IAS Vikas Sheel letter to states ) यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची लागण झाली तर त्या व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत लस देऊ नये, असे पत्रात नमूद केले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव विकास शील म्हणाले, की 15 ते 18 वर्षाच्या मुलांना आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जात आहे. त्याचबरोबर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनाही लस दिली ( corona vaccination for children ) जात आहे. जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर तीन महिन्यांपर्यंत लस देण्यात येऊ नये.
हेही वाचा-India Corona Update : भारतात 24 तासांत 3.37 लाख कोविड रुग्णांची नोंद; आधीपेक्षा २.७ टक्के घट