Karnataka Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. योग्य रणनीती आणि स्थानिक समस्यांची मेळ घालून काँग्रेसने विजयाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. कर्नाटक राज्यात भाजपाने काही चुका अशा केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या हातात असलेले दक्षिणेतील एकमेव राज्य देखील गेले. दरम्यान, भाजप कर्नाटकात का पराभूत झाले याचे कारण सर्व बाजूने जाणून घेतले पाहिजे. याचमुळे आपण लिंगायत समाजाची राजकारणातील प्रभाव जाणून घेणार आहोत.
लिंगायत समाजाकडे दुर्लक्ष : या निवडणुकीत भाजपाने स्थानिक प्रश्नांना बगल देत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, हे एक पराभवाचे मोठे कारण ठरले. त्याचप्रमाणे भाजपा स्थानिक लोकांच्या भावनांना ओळखण्यास यावेळी कमी पडली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे लिंगायत समाजाने फिरवलेली पाठ. लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळावायचा असेल तर भाजपाला दक्षिण स्वारी जिंकावी लागणार आहे. दक्षिणेतील पाच राज्य आणि एक केंद्राशासित राज्य आहे, जेथे भाजपाची पकड नाही. या राज्यांमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी कर्नाटक राज्य हे भाजपासाठी एक दरवाजा होता. परंतु तेही आता हातातून गेले आहे. यामागील कारण म्हणजे लिंगायत समाजाकडे भाजपाचे झालेले दुर्लक्ष.
मुख्यमंत्री कोण बनेल : भाजपाने यावेळी अख्या प्रचार केला परंतु मुख्यमंत्री कोण असेल हे जाहीर केले नव्हते. लिंगायत समाजाच्या नेत्याऐवजी दुसरा कोणी नेता मुख्यमंत्री करणे भाजपाला हानीकारक ठरले असते. येडीयुरप्पा यांना हटवल्यानंतर 28 जुलै 2021ला बसवराज बोम्मई यांना भाजपाने मुख्यमंत्री पदावर बसवले होते. येडीयुरप्पा यांच्यानंतर बोम्मई हे लिंगायत समाजाचे भाजपमधील दुसरे मोठे नेते आहेत. शिग्गवा या मतदारसंघात बोम्मई यासारखा भाजपाकडे दुसरा कोणी दमदार नेता नव्हता. बोम्मई या मतदारसंघातून 2013, 2018 आणि आता 2023 रोजी निवडून येणारे नेते आहेत. पण भाजपाने मुख्यमंत्री कोण होणार हे घोषित न करता निवडणुकीला सामोरे जाणे योग्य समजले आणि त्याचा परिणाम भाजपाचा दारुण पराभव झाला.
नाराजीचा परिणाम :अजून एक उदाहरण येडीयुरप्पा यांचेच देता येईल. लिंगायत समाजाची नाराजी नको म्हणून भारतीय जनता पक्षाने 75 वर्षाच्या आणि त्यापेक्षा नेत्यांना मार्गदर्शक मंडळात नेमण्याचा निर्णय मोडीत काढत बी.एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवले होते. 2013 साली त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. त्यावेळी भाजपाला लिंगायत समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता. कारण भाजपाचा व्होट बँक असलेला लिंगायत समाज दूर गेला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी येडीयुरप्पा यांनी परत भाजपात यावे ही विनंती केली होती. यावेळी भाजप पुन्हा एकदा लिंगायत समाजातील मतदारांवर भरोसा ठेवला होता. मागील दोन दशकांमध्ये भाजपला मतदान केल्यास मुख्यमंत्री लिंगायत समाजाचाच होईल, याची खात्री लिंगायत समाजाला होती. मात्र, पक्षातील बलाढ्य नेते बी.एस. येडियुराप्पाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हते. यामुळे लिंगायत समाजाचे लोक भाजपावर नाराज होते. याशिवाय भाजपाने बी.एस येडीयुरप्पा यांना काही काळ मुख्य प्रवाहातून बाजूला केले होते, त्याचाही राग या समाजाच्या लोकांमध्ये होता.
वीरशैव लिंगायत फोरमचा काँग्रेसला पाठिंबा : वीरशैव लिंगायत समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. काँग्रेसने या समाजाचा विश्वास जिंकला होता. लिंगायत समाजाच्या सदस्यांना 30 आणि वोक्कालिंगा जमातीला 24 तिकीट दिले होते. त्याचबरोबर काँग्रेसने लिंगायत समाजाने वेगळ्या धर्माची मागणी 2018 मध्ये केली होती. त्यावेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता.