कन्नूर : केरळमधील कन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली ( Bomb Hurled At RSS Office ) आहे. या घटनेनंतर आरएसएस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 1.30 वाजता कन्नूरच्या पायनूर येथील आरएसएस कार्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.