मुंबई:अभिनेत्री कंगना रणौत आपली बहिण रंगोली चंदेलसह वांद्रे पोलीस स्टेशनमधून जबाब नोंदवल्यानंतर बाहेर पडली आहे. तिची पोलिसांनी २ तास चौकशी केली. कंगना १ वाजून ५ मिनीटांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती आणि ३ वाजून १० मिनीटांनी ती बाहेर पडली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत आपली बहीण रंगोलीसह वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. बॉलिवूड संदर्भात केलेल्या विवादीत पोस्ट प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतला चौकशीसाठी आज वांद्रे पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.
कंगना रणौत पोलीस स्टेशनमधून बाहेर गैरहजर राहण्यासाठी केली होती विनंती अभिनेत्री कंगना रणौत वैयक्तिक कारणामुळे चौकशीसाठी गैरहजर राहत होती. त्यामुळे वांद्रा पोलिसांकडून कंगनाला वारंवार समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर तीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वैयक्तिक कारणांमुळे मुंबई येऊ शकत नसल्याचे तीने न्यायालयाला कळवले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला तिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात सोशल माध्यमांवर किंवा माध्यमांमध्ये कुठल्याही प्रकारची टीका- टिपण्णी न करण्याचे आदेश दिले होते.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर कंगना विरोधात याचिकाकंगना राणौत हिने सोशल माध्यमांवर बॉलीवुड इंडस्ट्री बद्दल विवादीत ट्वीट केले होते. बॉलीवूडमध्ये हिंदू-मुस्लीम असे गट असल्याचा दावा तीने ट्वीटद्वारे केला होता. याबरोबरच मुस्लिम बहुल चित्रपट सृष्टीत मी स्वतः माझं नाव मोठे केले असल्याचे तिने म्हटले होते. मात्र, बॉलीवूडचे जातीपातीशी काही घेणेदेणे नसल्याचा याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. कंगना यामाध्यमातून धर्माधर्मात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा
वांद्रे पोलीस ठाण्यांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर अभिनेत्री कंगना राणौत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी कंगना व रंगोली चंदेल यांची चौकशी करण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा पोलिसांनी समन्स पाठवले होते. तरीही कंगना चौकशीसाठी गैरहजर राहिली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून तिला काही वेळासाठी दिलासा मिळाला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायलयानेच आज (8 जानेवारी रोजी) कंगनाला वांद्रे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसमोर कंगणाला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार- संजय राऊत