महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bollywood actor Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या मराठी चित्रपटाचे उत्तराखंडमध्ये शूटिंग सुरू... - shooting marathi film in Uttarakhand

बॉलिवूड स्टार नाना पाटेकर सध्या चमोलीत आहेत. ते त्यांच्या टीमसोबत नीती घाटीमध्ये (shooting marathi film in niti valley) एका मराठी चित्रपटाचे शूटिंग करत (Nana Patekar shooting marathi film) आहेत. सोबतच जोशीमठच्या दऱ्याखोऱ्यांचा आनंद घेत आहेत.

Bollywood actor Nana Patekar
अभिनेते नाना पाटेकर

By

Published : Sep 21, 2022, 12:45 PM IST

चमोली :जोशीमठच्या सुंदर दऱ्या आजकालचे चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आकर्षित करत आहेत. सध्या चित्रपट अभिनेते नाना पाटेकर चमोली येथील जोशीमठ परिसरात एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचले (Nana Patekar shooting marathi film) आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांना जोशीमठच्या दऱ्या खूप आवडतात.

चित्रपटाच्या नावाबाबत गोपनीयता -कोकोनट मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली चित्रपट निर्माते रिश्मन मजेठिया, त्यांच्या फिल्म युनिटसह, चमोली जिल्ह्यातील जोशीमठ ब्लॉकमधील भारत - चीन सीमेवर असलेल्या लता, मलारी गावात मराठी चित्रपटाचे शूटिंग करत (Nana Patekar shooting Marathi film in Niti Valley) आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर वडिलांच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ त्यांच्या मुलाच्या भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाच्या नावाबाबत गोपनीयता आहे.

जोशीमठ चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनुकूल -जोशीमठ परिसरात चित्रपटांच्या शूटिंगसाठी खूप शक्यता आहेत. अनेक वर्षांपूर्वी 1997 मध्ये सुनील सेट्टीच्या 'हम पंछी एक डॉल के' चित्रपटाचे शूटिंग औलीच्या खोऱ्यात झाले होते. मात्र, काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. बॉलीवूड चित्रपट कृष्णा कॉटेजसह अनेक मालिका औलीमध्ये शूट करण्यात आल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील व्यक्ती आणि त्याच्याशी निगडित लोक या भागात सतत भेट (Bollywood star Nana Patekar Chamoli )देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details