मुंबई -बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर Amitabh Bachchan corona report negative मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 22 दिवस नानावटी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहे.
Amitabh Bachchan अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर Amitabh Bachchan corona report negative मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 22 दिवस नानावटी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मी आता घरी आलो आहे. देवाच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने, मित्रांच्या आणि चाहत्यांच्या प्रार्थनांनी आणि मी प्रेमाने मी बरा झालो आहे. तसेच नानावटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी आज हा दिवस पाहू शकलो आहे, असेही अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
यापूर्वी बच्चन कुटुंबात जुलै 2020 मध्ये अभिनेता मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सगळ्यांनी कोरोना तेव्हा सकारात्मक मात केली होती. अमिताभ बच्चन हे आपल्या पुढील शूटसाठी बाहेर पडणार आहे. कारण विविध आगामी सिनेमांमध्ये ते दिसणार आहे.