महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Har Ghar Tiranga अभिनेता आमिर खानचा हर घर तिरंगाला पाठिंबा - Changemakers

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेला आमिर खान त्याच्या हटके अंदाजाने नेहमी ओळखला जातो. तसा आमिर खान हा सहसा न्यूजमध्ये, कोणत्याही इव्हेंटमध्ये फारसा दिसत नाही. परंतु, त्याच्या प्रत्येक चित्रपटातून तो सतत नवनवीन भूमिका मांडत असतो. आज मुंबईतील त्याच्या घराच्या बाल्कनीत कन्या ईरासोबत दिसून आला. बाल्कनीत फडकत असलेला तिरंगा यावरून त्याचा हर घर तिरंगाला पाठिंबा असल्याचे दिसून आले. Indian Independence Day Azadi Ka Amrit Mahotsav

Aamir Khan supports Har Ghar Tiranga
अभिनेता आमिर खानचा हर घर तिरंगाला पाठिंबा

By

Published : Aug 13, 2022, 7:39 AM IST

मुंबईआमिर खान ( Bollywood Actor Aamir Khan )सहसा न्यूजमध्ये राहत ( Indian Independence Day ) नाही. परंतु, तो अशा काही गोष्टी करीत असतो, ज्या कदाचित काहींना पटत नसतील. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य ( Azadi Ka Amrit Mahotsav ) आहे आणि प्रत्येकाने त्याचा वापर जबाबदारीने करायचा असतो. परंतु, आज आमिर खान त्याच्या मुंबईतील बंगल्यातील बाल्कनीत तिरंगा फडकत असल्याचे दिसून आले. ( Aamir khan Daughter Ira ) त्यामुळे आमिर खानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी पुकारलेल्या हर घर तिरंगा मोहिमेला ( Har Ghar Tiranga Campaign ) पाठिंबा असल्याचे दिसून आले. आमिर खान दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा प्रदर्शित झाला आहे.

आमिरच्या घराच्या बाल्कनीत फडकतोय तिरंगा लाल सिंग चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर आमिर आपली मुलगी ईरासोबत आपल्या समुद्र किनाऱ्यासमोरील असलेल्या घराच्या बाल्कनीत उभा असलेला दिसला. काही छायाचित्रकारांनी ते मोमेंट्स टिपले ज्यात असेही दिसून आले की, आमिरच्या घराच्या बाल्कनीत तिरंगा फडकत होता. याचाच अर्थ असा आहे की, हा सुपरस्टार आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा' अभियानाचे समर्थन करतोय.

आमिर खानचा नवीन चित्रपट लाल सिंग चड्ढा गेल्या चार वर्षांपासून आमिर खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे या चित्रपटाबाबतीत प्रेक्षकांना उत्सुकता नक्कीच आहे. परंतु, आमिर खानच्या विरुद्ध काही मोहिमा सुरू आहेत. त्याला पाठिंबा द्यायचा अथवा विरोध करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमिर खानने त्याला राष्ट्रविरोधी म्हटल्याचे उत्तर आपल्या कृतीतून दिले आहे. सध्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली ‘हर घर तिरंगा’ मोहीम जोर धरतेय. मुंबईतील अनेक घरांतून तिरंगा फडकताना दिसतोय, ज्यात आमिर खानच्या घराचाही समावेश आहे.

एस एस राजमौली यांनी केले होत लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुकआमिर खानचा बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. या ट्रेलरने अवघ्या २४ तासांत ६२ दशलक्ष व्ह्यूज मिळवले असून, लाल सिंग चड्ढाने इंटरनेटवर मेसेजेसचा धुमाकूळ घातला आहे. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांनी अभिनंदनाचे संदेश पोस्ट केले असून आरआरआर मेकर एसएस राजामौली यांसारख्या भारतीय मान्यवरांसह सर्वांनी या ट्रेलरचे कौतुक केले आहे. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर राजामौली यांनी लिहिले, आमिर ४ वर्षांनंतर एका भावपूर्ण चित्रपटासह परत येत आहे. लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर आवडला. तो नेहमी करतो तसा तो रॉक करतोय. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासाठी मी उतावीळ झालोय, अजून प्रतीक्षा करू शकत नाही. माझ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा

हेही वाचा Eknath Shinde in Satara मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साताऱ्यात खळबळजनक वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details