महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bettiah Accident : शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांना भरधाव बोलेरोने चिरडले; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

एका अनियंत्रित बोलेरो गाडीने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. या अपघातात तीन मुलांचा मृत्यू झालाय. तर पाच मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. बिहारमधील बेतिया येथे हा अपघात झाला.

Accident
अपघात

By

Published : Aug 18, 2023, 8:55 PM IST

Updated : Aug 19, 2023, 6:39 AM IST

पश्चिम चंपारण (बिहार) : बिहारमधील बेतिया येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे तीन शाळकरी मुलांचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय. ही घटना मुफस्सिल पोलिस ठाण्यांतर्गत मछली लोक जवळघडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

दोन मुलांचा जागीच मृत्यू :हेशाळकरीविद्यार्थी शाळेतून घरी परतत होते. दरम्यान, रस्ता ओलांडत असताना एका अनियंत्रित बोलेरो गाडीने त्यांना चिरडले. यामध्ये सहा मुले जखमी झाली. या घटनेत दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

पाच शाळकरी मुलांची प्रकृती चिंताजनक : ही घटना मछली लोक, मुफस्सिल पोलीस स्टेशन हद्दीत घडली. येथे बेलदरी हरिजन शाळेतील विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरोने धडक दिली. या घटनेत तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय. तर पाच शाळकरी मुले जखमी झाले आहेत. जखमी मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बेतिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर चालक वाहनासह फरार:सध्या पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. घटनेनंतर बोलेरो चालक वाहनासह फरार झाला. मुफस्सिल पोलिस स्टेशनच्या एएसआयने सांगितले की, बोलेरोने घटनास्थळी एकूण ७ मुलांना तुडवले. यामध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरलीय. पालकांची रडून रडून वाईट अवस्था झालीय. भरधाव वेगामुळे दररोज अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र असे असतानाही त्यावर नियंत्रण ठेवले जात नाही, असा त्यांचा आरोप आहे.

डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू : गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली होती. जिल्ह्यातील वाई आगारात एक 13 वर्षांची शाळकरी मुलगी एसटीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. वाई आगारात एसटी फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली. गर्दीत धक्का लागल्याने ही मुलगी खाली पडली. त्यानंतर तिच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा :

  1. Jharkhand Bus Accident : झारखंडमध्ये बस नदीत कोसळून चार जणांचा मृत्यू, फरार चालकाचा शोध सुरू
  2. Car Accident Video: अपघातानंतर कार कोसळली कालव्यात, पोलिसांनी वाहून जाणाऱ्या ५ जणांचे वाचविले प्राण
  3. Muharram Accident : मोहरमच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; ताजिया विजेच्या तारात अडकल्याने 4 जणांचा मृत्यू
Last Updated : Aug 19, 2023, 6:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details