पणजी (गोवा)- कलंगुट समुद्रकिनारी एका तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. सिद्धी नाईक (19) असे मृत तरूणीचे नाव आहे. दरम्यान मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतर या तरूणीचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली आहे.बुधवारपासून तरुणी होती बेपत्ता
गोवा : कलंगुट समुद्रकिनारी आढळला तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह
बुधवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धी नाईक या तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कलंगुट समुद्रकिनारी (गुरुवारी) सकाळी आढळून आला. शवविच्छेदन अहवालांतर हा मृत्यू समुद्रात बुडून श्वास गुदमरून झाल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली आहे.
सिद्धी नाईक ही 19 वर्षीय तरुणी काल सकाळपासून बेपत्ता होती. म्हापसा येथील ग्रीन पार्क जंकशन येथून ती बेपत्ता झाली. सिद्धी पर्वरी येथे एका दुकानात काम करत होती. तिला तिच्या वडिलांनी गिरी म्हापसा येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास खासगी बसने प्रवास करण्यासाठी सोडले होते. सिद्धी ग्रीन पार्क जंकशन येथून पर्वरी येथे जाणार होती. मात्र वेळेत दुकानात न पोहोचल्याने दुकान मालकाने तिच्या घरी सांगितले. मात्र सिद्धीने आपला फोन घरीच ठेवल्याचे समजून आले होते. दरम्यान सिद्धीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल केली होती. बुधवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धी नाईक या तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कलंगुट समुद्रकिनारी (गुरुवारी) सकाळी आढळून आला. शवविच्छेदन अहवालांतर हा मृत्यू समुद्रात बुडून श्वास गुदमरून झाल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली आहे.