बेंगळुरू:शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून पटकावणारा तरुण सहज पैसे कमवण्यासाठी चोरी करायला लागला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. होय, आंध्र प्रदेशसह शहरात चोरी करणाऱ्या बॉडी बिल्डर तसेच त्याच्या सहकारी असलेल्या दोघांना अटक करण्यात गिरीनगर पोलिसांना यश आले आहे.
मिस्टर आंध्र फेम सय्यद बाशाआणि त्याचा साथीदार शेख अयुब अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा लाखांची सोनसाखळी आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. मूळचा कडप्पा, आंध्र प्रदेश येथील, सय्यद भाषा याने 2005 ते 2015 या काळात कुवेतमध्ये कार चालक म्हणून काम केले. परदेशात असताना तो सोन्याच्या तस्करीत गुंतला होता. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तो भारतात आला होता आणि त्याला शारीरिक व्यायामाची आवड निर्माण झाली होती. त्याने शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेऊन मिस्टर आंध्र ही उपाधी मिळवली. सहज पैसे कमवण्यासाठी सय्यद बाशा याने गुन्हेगारी जगतातील आरोपींशी संबंध जोडले आणि त्यानंतर तो नियमितपणे चोऱ्या करु लागला.
बाशाला चोरीच्या आरोपाखाली अटक:यापूर्वी कडप्पा येथील स्थानिक पोलिसांनी सय्यद बाशाला चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. तुरुंगात असताना एका कैद्याने तो बंगळुरूमध्ये सहज चोरी करू शकतो, अशी माहिती दिली होती. याप्रमाणे तो जामीन मिळवून बंगळुरूला आला. आरोपी गिरीनगर आणि सुब्रमण्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.