तेजपूर (आसाम) -अरुणाचल प्रदेशच्या ( Arunachal Pradesh Avalanche ) कामेंग प्रांतातील पर्वतरांगामध्ये रविवारी ६ फेब्रुवारी रोजी हिमस्खलनाची ( Avalanche in Arunachal ) मोठी दुर्घटना घडली होती. यात लष्कराचे 7 जवान अडकले आहेत. या जवानांना वाचवण्यासाठी लष्कराने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. मात्र हिमस्खलनात ( Kameng sector Avalanche ) अडकलेल्या सात लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्करी ( Indian army ) अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांचे मृतदेह हिमस्खलनाच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.
सातही जवांनाचा मृत्यू -
रविवारी गस्तीवर असताना हिमस्खलनात अडकलेल्या सात जवानांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील कामेंग प्रांतामध्ये ऑपरेशन सुरू केले होते. शोध आणि बचाव कार्य आता पूर्ण झाले असून हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सातही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. "दुर्दैवाने, सर्व सहभागींच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही, सातही जण मरण पावले" असे भारतीय लष्कराच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.