पूर्व चंपारण (बिहार) -बिहारच्या गोढिया हराजमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सिकरहना नदीमध्ये बोट उलटल्याने २२ जण बुडाले आहेत. स्थानिकांनी एक मृतदेह बाहेर काढला असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे.
बिहारमधील पूर्व चंपारण परिसरातील शिकारगंज ठाण्याच्या हद्दीतील गोढिया हराज येथे सिकरहना नदीत बोटतून 30 जण हे काही कामासाठी नदीच्या पलीकडे जात होते. यावेळी बोट ही नदीच्या मुख्य प्रवाहात पोहचताच पाण्याच्या जास्त प्रवाहाने बोट उलटली. या बोटीतील 22 लोक बेपत्ता आहेत. तर गावकऱ्यांच्या मदतीने एका लहान मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.