नवसारी - प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे. हे आपन बऱ्याच उदाहरणातून पाहिलं आहे. आंतरिक इच्छेमध्ये पर्वतालाही हालवण्याचं सामर्थ्य असतं; असं म्हणतात. याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. अंध असललेल्या एका तरुणाने सायकल मोहीम सुरू केली आहे. अजय ललवाणी असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मुंबईतील रहिवासी आहे. अंध असल्याने जगणं थांबत नाही. साहस दाखवल्यास जीवनाच्या उंच शिखरावर पोहचता येते, असे संदेश त्याने दिला आहे.
डोळस कार्य; अंध व्यक्तीचा सायकलवरून भारत दौरा - अंध तरुणाचा भारता दौरा
अँध असललेल्या एका तरुणाने सायकल मोहीम सुरू केली आहे. अजय ललवाणी असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मुंबईतील रहिवासी आहे. मुंबई ते श्रीनगर, श्रीनगर ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबई असा 7500 किमी प्रवास अजय 45 दिवसांत सायकलवरून करणार आहे.
अंध असूनही तो सायकलिंग, रॉक क्लाइंबिंग आणि पोहणे या क्रिया करतो. 15 नोव्हेंबरपासून अजयने मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून रस्ता सुरक्षेचा संदेश देत आणि दृष्टिहीनांसाठी समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी सायकलिंग मोहीम सुरू केली आहे. एक दिवसाच्या प्रवासानंतर तो नवसारी येथे पोहचला. अजयला सायकलिंगसाठी मार्गदर्शन करण्यासाठी दोन कारसह 18 सदस्यांची टीम आहे. एक कार अजयच्या समोर तर दुसरी कार अजयच्या मागे आहे. अजय आणि त्याच्या टीम मेंबर्सकडे वॉकी टॉकी असून ते अजयला सूचना करत आहेत. सायकलचा वेग कमी कधी करायचा तसेच ब्रेक कधी लावायचा याची माहिती ते अजयला देतात. अशा प्रकारे अजय 45 दिवसांत 7500 किमीचे अंतर पार करणार आहे.
अजयला जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करायचे आहे. त्यामुळे त्याची एव्हरेस्ट चढण्याची क्षमताही वाढत आहे. मुंबई ते श्रीनगर, श्रीनगर ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबई असा 7500 किमी प्रवास अजय 45 दिवसांत सायकलवरून करणार आहे. यापूर्वी अजयने हिमालयात दोनदा 17 हजार आणि 20 हजार उंचीचे ट्रेकिंग केले आहे. पल्यातील उणीवा दूर करून आपण एक नवीन सकारात्मक विचाराने गडही जिंकू शकतो, हे अजयने दाखवून दिले आहे.