मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात (Blast in Kurkure Noodles Factory in Muzaffarpur) बॉयलर फुटल्यानेस्फोट झाला आहे. जिल्ह्यातील बेला औद्योगिक परिसरात ही घटना घडली. यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज घटनास्थळापासून पाच किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.