महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Motihari Brick Factory Blast : वीटभट्टीच्या चिमणीचा स्फोट, 7 जणांचा मृत्यू..अनेक गाडले गेले - आग लागल्याने वीटभट्टीच्या चिमणीचा स्फोट

हा अपघात (Motihari Brick Factory Blast) रामगढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 15 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (blast at brick factory in motihari Bihar).

Motihari Brick Factory Blast
Motihari Brick Factory Blast

By

Published : Dec 23, 2022, 9:39 PM IST

वीटभट्टीच्या चिमणीचा स्फोट

पूर्व चंपारण (बिहार) : बिहारच्या मोतिहारी मध्ये आग लागल्याने वीटभट्टीच्या चिमणीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. (blast at brick factory in motihari Bihar). घटनेत आतापर्यंत चिमणी मालकासह 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. चिमणीत अजूनही 10 मजूर गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. (Motihari Brick Factory Blast)

अपघातात १५ जण जखमी :हा अपघात रामगढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. नागिरगिरमध्ये वीटभट्टीची चिमणी कोसळल्याने अनेक मजूर गाडले गेले. 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 15 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ज्यांना जखमी अवस्थेत रक्सौल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

डीएम-एसपी घटनास्थळी पोहोचले :मिळालेल्या माहितीनुसार, चिमणी ऑपरेटर इर्शाद अहमद यांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या माहितीवरून डीएम आणि एसपी घटनास्थळी रवाना झाले आहेत. रामगढवा, सुगौली, रक्सौल आणि पलानवासह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details