बंगळुरू -आक्षेपार्ह फोटो इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी दिल्याने बंगळुरूतील एका २४ वर्षीय युवकाने ( Engineer commits suicide in Bengaluru ) रेल्वे खाली येऊन २५ जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमागे न्यूड गँगचा हात ( Nude Gang ) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर युवकांनी अशा धमक्यांना घाबरून टोकाचे पाऊल उचलू नये आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
Bengaluru Youth Commits Suicide : आक्षेपार्ह फोटो शेयर करण्याची धमकी दिल्याने २४ वर्षीय युवकाची आत्महत्या - बंगळुरू युवकाची आत्महत्या
आक्षेपार्ह फोटो इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी दिल्याने बंगळुरूतील एका २४ वर्षीय युवकाने ( Engineer commits suicide in Bengaluru ) रेल्वे खाली येऊन २५ जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमागे न्यूड गँगचा हात ( Nude Gang ) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
![Bengaluru Youth Commits Suicide : आक्षेपार्ह फोटो शेयर करण्याची धमकी दिल्याने २४ वर्षीय युवकाची आत्महत्या youth suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:47:54:1643278674-image-2701newsroom-1643265502-886.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गॅंग मेंबरने एका डेटिंग अॅपवर मुलीच्या नावाने अकाउंट उघडले आणि या पीडित युवकाशी चॅटिंग सुरु केली. मैत्री वाढवून त्याला कॅमेरासमोर नग्न होण्यास सांगितले. पीडित युवकाने तसे केले असता, गॅंग मेंबरने व्हिडीओ आणि फोटो काढले आणि युवकाला धमकावण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी युवकाला मिळाली होती.
पीडित २४ वर्षीय युवक मल्लेश्वरम भागात आपल्या परिवारासह राहत होता. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना धमकीचे मेसेज मिळाले. यामागे न्यूड गॅंगचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.