महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Black ink thrown at Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर फेकली शाई, बंगळुरूमधील पत्रकार परिषेदत धक्कादायक प्रकार

कर्नाटकातील कोडिहल्ली चंद्रशेखर या शेतकरी नेत्याला ( farmer leader Kodihalli Chandrasekhar ) पैसे मागताना पकडण्यात आले. शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युधवीर पत्रकारांना संबोधित करत ( Rakesh Tikait press meet in Bengaluru ) होते. पत्रकार परिषद सुरू असताना काही जणांनी वाद घालत त्यांच्यावर काळी शाई ( ink thrown on Rakesh Tikait ) फेकली. एवढेच नाही तर खुर्च्याही फेकण्यास सुरुवात केली.

शेतकरी नेते राकेश टिकैत
शेतकरी नेते राकेश टिकैत

By

Published : May 30, 2022, 3:08 PM IST

बंगळुरू- सोमवारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कर्नाटकात आलेले शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युधवीर सिंग यांच्यावर ( Farmers leaders Rakesh Tikait and Yudhveer Singh ) काळी शाई फेकण्यात ( black ink thrown on Rakesh Tikait ) आली. स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओवर दोन्ही शेतकरी नेते स्पष्टीकरण देत असताना ही घटना घडली.

कर्नाटकातील शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर ( farmer leader Kodihalli Chandrasekhar ) याला पैसे मागताना पकडण्यात आले. शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युधवीर पत्रकारांना संबोधित करत ( Rakesh Tikait press meet in Bengaluru ) होते. पत्रकार परिषद सुरू असताना काही जणांनी वाद घालत त्यांच्यावर काळी शाई ( ink thrown on Rakesh Tikait ) फेकली. एवढेच नाही तर खुर्च्याही फेकण्यास सुरुवात केली. टिकैत यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी शाई फेकली होती. राकेश टिकैत यांनी या घटनेसाठी राज्यातील भाजप सरकारला जबाबदार धरले आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने हा प्रकार घडल्याचे टिकैत यांनी सांगितले. स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर फेकली शाई

भारतीय किसान संघटनेत फूट-विशेष म्हणजे, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील गाझीपूर सीमेवर वर्षभर चाललेल्या शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान (BKU) नेते राकेश टिकैत आघाडीवर होते. मात्र, बीकेयू संघटनेत अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे. राकेश टिकैत यांच्यावर स्वर्गीय चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या विचारसरणीपासून दूर गेल्याचा आरोप आहे.

कोण आहेत राकेश टिकैत ?केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनांतर केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. शेतकरी आंदोलनातून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच नाव समोर आले. सध्या हे नाव देशपातळीवर चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी गावाकडे परतले होते. मात्र, राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा नवी आशा मिळाली होती. राकेश टिकैत यांनी देशभरात शेतकरी पंचायत घेतली आहे.

हेही वाचा-Kisan Mahapanchayat : मोदींवर भरवसा नाही.. MSP कायदा मंजूर केल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे नाही - टिकैत

हेही वाचा-Sanjay Raut Meets Rakesh Tikait : खासदार संजय राऊत यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट

हेही वाचा-Rakesh Tikait in Aurangabad : राकेश टिकैत यांचे नव्या आंदोलनाचे संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details