महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल : सुरक्षा कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट - भाजपा परिवर्तन यात्रा न्यूज

भारतीय जनता पक्षाच्या 'परिवर्तन यात्रा' दरम्यान बैरेकपूरमध्ये झटपट झाल्याची बातमी समोर आली आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिवर्तन यात्रा थांबविल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल

By

Published : Feb 24, 2021, 8:36 PM IST

बैरकपुर (पश्चिम बंगाल) - यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या 'परिवर्तन यात्रा' दरम्यान बैरेकपूरमध्ये झटपट झाल्याची बातमी समोर आली आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिवर्तन यात्रा थांबविल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे.

'परिवर्तन यात्रा' दरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट

पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यात भाजपा कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी 'परिवर्तन यात्रा' ची सुरवात 6 फेब्रुवारीला केली होती. राज्यातील अनेक ठिकाणी भाजपाकडून 'परिवर्तन यात्रा' काढण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाकडून लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. दोन्ही पक्षांकडून रोड शो आणि सभा घेण्यात येत असून एकमेंकावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारची प्रतिमा चमकदार करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तर ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय योजना रोखून केवळ राजकीय स्वार्थासाटी नागरिकांचे नुकसान केल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्ष आपल्या सभेमधून अनेक आश्वासनाची खैरात वाटली जातेय.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं नाही. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details