त्रिपुरा : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालांनुसार, भाजप-आयपीएफटी युतीने 60 सदस्यीय राज्य विधानसभेत 34 जागा जिंकल्या आहेत, त्यापैकी 32 जागा एकट्या भाजपने जिकंल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस, डाव्या आघाडीच्या 14 निवडूण आल्या आहेत., तर पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या टिपरा मोथा पक्षाचे 13 उमेदवार विजयी झाले आहेत.
एनपीपीने मागितला भाजपकडे पाठिंबा :त्रिपुरा, मेघालय, नागालँड या ईशान्य भारतातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परिस्थिती जवळपास स्पष्ट झाली असून, नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला बहुमत मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे, तर मेघालयमध्ये NPP सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. एनपीपीने भाजपकडे पाठिंबा मागितला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्य युनिटला एनपीपीला पाठिंबा देण्याचे आदेश दिले आहेत.
विजयाचे श्रेय मोंदीना : त्रिपुरामध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याच्या दुहेरी इंजिन विकास मॉडेलला दिले आहे. आम्ही अधिक विकास करुन नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बहुमतासाठी ३१ जागा आवश्यक : राज्यात सुमारे ८८ टक्के मतदान झाले होते. त्रिपुरातील विधानसभेच्या ६० जागांपैकी बहुमतासाठी ३१ जागा आवश्यक आहेत. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष, आयपीएफटी, टिपरा मोथा (टीएमपी), डावे आणि काँग्रेस पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. येथे डावे आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढले, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
मोदींनी मानले जनतेचे आभार : ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीन राज्यांतील जनतेचे आभार मानले आहेत. गुरुवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात नेते, कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, 'ईशान्य भारत आता ना हृदयापासून आहे, ना दिल्लीपासून. ही निवडणूक हृदयातील अंतर संपवून नव्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. हे नवे युग हा नवा इतिहास रचण्याचा क्षण आहे. निवडणूक जिंकण्यापेक्षाही मला समाधान आहे की, पंतप्रधानांच्या कार्यकाळात त्यांनी वारंवार ईशान्येला जाऊन लोकांची मने जिंकली आहेत. ते म्हणाले, 'आजचे निकाल हे दाखवतात की भारतातील लोकशाहीबद्दल दृढ आशावाद आहे. या राज्यांतील जनतेने आमच्या सहकारी पक्षांना आशीर्वाद दिला आहे. भाजपसाठी दिल्लीत काम करणे अवघड नाही, परंतु ईशान्येतील आमच्या कार्यकर्त्यांनी दुप्पट मेहनत केली., त्यांच्या मेहनतीबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आभार मानतो'. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मेघालय विधानसभा निवडणूक निकाल -
एकूण जागा – 60
एनपीपी- 26
यूडीपी- 11
काँग्रेस- 05
टीएमसी- 05
काँग्रेस-02
एका जागेवर मतमोजणी सुरू