महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa Election Result 2022 : गोव्यात भाजपला 18 ते 22 जागा, आम्हीच सरकार स्थापन करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात भाजपला (Goa BJP) 18-22 जागा मिळणार असून, आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांवी व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या 10 मार्चला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Result) जाहीर होणार आहेत.

pramod sawant
गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By

Published : Mar 7, 2022, 8:09 PM IST

पणजी - गोव्यात भाजपला (Goa BJP) 18-22 जागा मिळणार असून, आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांवी व्यक्त केला आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य असल्याचेही सावंत म्हणाले. दरम्यान, येत्या 10 मार्चला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Result) जाहीर होणार आहेत.

गोव्यात भाजपच सरकार स्थापन करणार - प्रमोद सावंत

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, एक्झिट पोलनुसार भाजप हे यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्तेवर येईल. तसेच पंजाबमध्ये भाजप चांगली कामगिरी करेल. गोव्यात भाजपला 18 ते 22 जागा मिळणार असून आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details