पाटणा (बिहार) -बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. जेडीयूचे नेते तथा ( jdu national president lalan singh claim ) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड करून लालू प्रसाद यादव ( JDU new claim ) यांच्या आरजेडीशी हातमिळवणी केली. यामुळे राज्यातील भाजप ( bjp tried to pressure RJD claim lalan singh ) पक्षात मोठी नाराजी आणि संतापाची लाट पसरली आहे. भाजपकडून आता नितीश कुमार यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहे. नितीश यांनी केलेले कृत्य हे नवे नाही. या अगोदरही त्यांनी आरजेडीशी युती केली होती. मात्र, नंतर त्यांनी ती सोडून पुन्हा भाजपचा पदर पकडला. मात्र, यंदा नितीश यांनी ( bjp tried to pressure RJD ) केलेले कृत्य भाजपच्या वर्मी लागले आहे. भाजपकडून होणाऱ्या आरोपांवर, टीकेवर आता जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी मोठ्या गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आरजेडीच्या आमदारांना 2-3 दिवस थांबण्याची विनंती केली होती, असा दावा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.
हेही वाचा -Har Ghar Tiranga कधीही न पाहिलेली, तापी नदीत 75 बोटींची तिरंगा रॅली
नितीश यांच्याशी युती करा, पण दोन-तीन दिवस थांबा -नितीश कुमार यांच्यामध्ये जोपर्यंत सहन करण्याची क्षमता होती तोपर्यंत त्यांनी सहन केले, असे भाजपवर प्रत्युत्तर देताना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले. तसेच, भाजपचे नेते सुशील मोदी यांच्याविषयी बोलताना ते नितीश कुमार यांचे मित्र आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांचे पुनर्वसन होते असेल तर आमचा काही आक्षेप नाही, असेही ललन सिंह म्हणाले. जेडीयूला कोणीही तोडू शकत नाही. हा प्रयत्न आरजेडीच्या वतीने भाजप करत होती. नितीश यांच्याशी युती करा, पण दोन-तीन दिवस थांबा, असे भाजपवाले आरजेडीच्या नेत्यांना फोन करून विनंती करत होते, असा दावा आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.