महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Zakir Naik : वादग्रस्त झाकीर नाईकला फिफा विश्वचषकाचे निमंत्रण, भाजप नेत्याचे बहिष्कार टाकण्याचे आवाहन - झाकीर नाईक

भारताने बंदी घातलेल्या इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याला सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकादरम्यान इस्लामवर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्याला निमंत्रण दिल्यामुळे भाजप प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स ( BJP Spokesperson Savio Rodrigues ) यांनी मंगळवारी सरकार, भारतीय फुटबॉल संघटना आणि यजमान राष्ट्राचा प्रवास करणाऱ्या भारतीयांना फिफा विश्वचषकावर ( FIFA World Cup ) बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 22, 2022, 5:53 PM IST

पणजी (गोवा) : वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकला ( Islamic preacher Zakir Naik ) कतारने फिफा विश्वचषकाचे निमंत्रण दिले आहे. झाकीर नाईकला निमंत्रण दिल्यामुळे भाजप प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स ( BJP Spokesperson Savio Rodrigues ) यांनी मंगळवारी सरकार, भारतीय फुटबॉल संघटना आणि यजमान राष्ट्राचा प्रवास करणारे भारतीयांना फिफा विश्वचषकावर ( FIFA World Cup ) बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

दहशतवादाला समर्थन - भारताने बंदी घातलेल्या इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांस फिफा विश्वचषकादरम्यान इस्लामवर व्याख्यान देण्यासाठी कतारने निमंत्रित केले आहे. रॉड्रिग्स म्हणाले की, "जग दहशतवादाविरुद्ध लढत असताना नाईकला व्यासपीठ निमंत्रण देणे म्हणजे द्वेष पसरवण्यासाठी दहशतवादी समर्थन देण्यासारखे आहे. फिफा विश्वचषक हा जागतिक कार्यक्रम आहे. जगभरातील लोक या नेत्रदीपक खेळाचे साक्षीदार होण्यासाठी येतात आणि लाखो लोक ती स्पर्धा टीव्ही आणि इंटरनेटवर पाहतात." जग जागतिक दहशतवादाशी लढत असताना झाकीर नाईकला एक व्यासपीठ देणे हे एका दहशतवाद्याला त्याचा कट्टरतावाद आणि द्वेष पसरवण्यासाठी व्यासपीठ देण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.

द्वेष पसरविण्यात मदत - भाजप प्रवक्ते रॉड्रिग्स यांनी देशातील लोकांना आणि दहशतवादाचा बळी ठरलेल्या परदेशातील लोकांना दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यात एकसंघ होऊन फिफा विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. झाकीर नाईक स्वतः दहशतवाद्यापेक्षा कमी नाही. त्यांनी भारतात इस्लामिक कट्टरतावाद आणि द्वेष पसरविण्यात मदत केली आहे, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

लादेनचा समर्थक - रॉड्रिग्स पुढे म्हणाले की, "झाकीर नाईक हा भारतीय कायद्यानुसार वॉन्टेड माणूस आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे गुन्हे आणि द्वेषपूर्ण भाषणांचे आरोप आहेत. तो दहशतवाद्यांचा सहानुभूतीदार आहे. खरे तर ते स्वत: दहशतवाद्यापेक्षा कमी नाही. त्यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनला उघडपणे समर्थन दिले आहे. भारतात इस्लामिक कट्टरतावाद आणि द्वेष पसरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे."

भारतात बंदी - या वर्षी मार्चच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने झाकीर नाईकने स्थापन केलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) ला बेकायदेशीर संघटना घोषित करून त्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. "वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक शेख झाकीर नाईक विश्वचषकादरम्यान कतारमध्ये उपस्थित आहेत आणि संपूर्ण स्पर्धेत अनेक धार्मिक व्याख्याने देतील," अल अरबिया न्यूजने कतारी सरकारी स्पोर्ट्स चॅनल अल्कासचे प्रस्तोता फैसल अलहजरी यांनी शनिवारी ट्विटरवर याबाबची माहिती दिली आहे.

दहशतावाद्यांचे समर्थन -केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे ( IRF ) संस्थापक झाकीर नाईकचे भाषण आक्षेपार्ह होते. कारण तो दहशतवाद्यांची प्रशंसा करतो. अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, झाकीर नाईक तरुणांचे जबरदस्तीने इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यास प्रोत्साहन देतो. आत्मघाती बॉम्बस्फोटांचे समर्थन करतो तसेच हिंदू, हिंदू देव देवतांविरूद्ध इतर धर्मांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट करत असतो. झाकीर नाईक भारत आणि परदेशातील मुस्लिम तरुण आणि दहशतवाद्यांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणखी प्रेरित करतो. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या सदस्यांच्या तसेच समर्थन करणाऱ्यांच्या बेकायदेशीर कृत्य गुजरात, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमध्ये दिसून आल्याचे त्या अधिसूचनेत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details