महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Criticized BJP RSS : भाजप, आरएसएस देशात द्वेष, राग पसरवत आहे : राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi Criticized BJP RSS भाजप, आरएसएस द्वेष, राग पसरवत BJP RSS spreading hatred anger contrary असून, त्यांचे हे वागणे समाजसुधारकांच्या शिकवणीच्या विरुद्ध असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे Rahul Gandhi Bharat Jodo Yatra .

Rahul Gandhi Criticized BJP RSS
भाजप, आरएसएस देशात द्वेष, राग पसरवत आहे : राहुल गांधींचा हल्लाबोल

By

Published : Sep 15, 2022, 11:05 AM IST

कोल्लम/तिरुवनंतपुरम ( केरळ ) : Rahul Gandhi Criticized BJP RSS काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजप आणि आरएसएसवर हल्ला सुरूच ठेवला आहे. त्यांनी आरोप केला की भाजप, आरएसएस देशात हिंसा, द्वेष आणि राग पसरवत BJP RSS spreading hatred anger contrary आहेत. हे श्री नारायण गुरूंसारख्या प्रसिद्ध समाजसुधारकांच्या शिकवणीच्या विरुद्ध असल्याचे गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रेच्या Rahul Gandhi Bharat Jodo Yatra केरळ राज्यातील चौथ्या आणि शेवटच्या दिवशी गांधी म्हणाले की, श्री नारायण गुरु, अय्यंकली आणि चटम्पी स्वामीकल सारख्या समाजसुधारकांनी हिंसा, द्वेष किंवा राग याचा प्रचार केला नाही. तथापि, भाजप आणि आरएसएसची विचारधारा ही द्वेष आणि रागाची आहे जी देशाला विभाजित आणि कमकुवत करत आहे. एकमेकांच्या विचारांबद्दलचा आदर, सहिष्णुता, आपल्या विरोधकांबद्दलची आपुलकी आणि अहिंसा ही भारतातील सर्वात मोठी ताकद ते हिरावून घेत आहेत.

महात्मा गांधींनी महासत्तेला पराभूत करण्यासाठी अहिंसेचा वापर केला. आज आपली खरी ताकद या विचारसरणीमुळे कमकुवत होत आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली राहुल गांधी यांची यात्रा जम्मू आणि काश्मीर येथे समारोप होईल. कोल्लम येथे दिवसभराच्या पदयात्रेच्या दोन टप्प्यातील ब्रेक दरम्यान, त्यांनी समाजातील विविध स्तरातील लोक, ऑटो-रिक्षा चालक आणि प्रतिनिधींची भेट घेतली.

गांधींनी सकाळी येथील शिवगिरी मठात प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक श्रीनारायण गुरू यांना आदरांजली अर्पण करून यात्रेची सुरुवात केली. शिवगिरी मठात, गांधी तिथल्या स्वामींना भेटले आणि संत सुधारकाला प्रार्थना केली. त्यांची भेट घेतल्यानंतर स्वामींपैकी एकाने प्रसारमाध्यमांना सांगितले की ते तेथे विनानिमंत्रित आल्याने त्यांना आनंद झाला. केरळमध्ये एझवा समाजाची संख्या २८ टक्के असताना, काँग्रेसमध्ये त्यांचा एकच आमदार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्हाला आशा आहे की ते या विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करतील, असे स्वामी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details