महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपाकडून आसाम निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर - आसाम निवडणुकीसाठी भाजपाची यादी

१२६ जागा असणाऱ्या आसाम विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपा ९२ जागांवर निवडणूक लढवत आहे.

BJP
भाजपा

By

Published : Mar 14, 2021, 6:59 PM IST

नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाने रविवारी आसाम विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तसेच आसाममध्ये भाजपा ९२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणादेखील केली.

दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले, "आसाममध्ये भाजप ९२ जागांवर लढेल, तर उर्वरित जागांवर आमचे घटकपक्ष लढतील." यासोबतच विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी भाजपने १७ उमेदवारांची यादीही जाहीर केली. चंद्रमोहन पटवारी धर्मपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.

असम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) यांच्यासोबत युती करून भाजप आसाममध्ये निवडणुका लढवत आहे. २०१६ मध्ये, भाजपाने काँग्रेसची १५ वर्षाची सत्ता संपवून पहिल्यांदाच सत्ता स्थापन करून इतिहास रचला होता. आसामच्या १२६ सदस्यांच्या विधानसभेत भाजप आणि त्याच्या सहयोगी एजीपी आणि बोडोलंड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) एकत्रित ८६ जागा जिंकल्या होत्या.

२०१६ च्या निवडणुकीत भाजपला ६० जागा, एजीपीला १४ आणि बीपीएफला १२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी बीपीएफ भाजपासोबतची युती तोडून कॉंग्रेसप्रणित युती 'महाजथ' मध्ये सामील झाली आहे.

१२६ जागा असणाऱ्या आसाम विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा -ईटीव्ही विशेष : महाविकासआघाडी सरकारमध्ये धूसफूस.. तीन पक्षात कुरघोडीचे राजकारण

ABOUT THE AUTHOR

...view details