महाराष्ट्र

maharashtra

मोफत पाणी आणि वीज.. हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

By

Published : Nov 27, 2020, 12:44 PM IST

Updated : Nov 27, 2020, 2:17 PM IST

हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध झाला असून यामध्ये मोफत पाणी आणि 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना विनामूल्य वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कोविड-19 वरील लस केंद्राच्या सूचनेनुसार सर्वांना दिली जाईल, साथीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी योजना तयार केली जाईल, असेही यात म्हटले आहे.

हैदराबाद महापालिका निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा
हैदराबाद महापालिका निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा

हैदराबाद (तेलंगणा) - शहरात नुकत्याच झालेल्या पावसाने बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत, 100 पेक्षा कमी युनिट वीज वापरणाऱ्या कुटुंबांना मोफत वीज आणि सिटी बस, मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवास देण्याचे आश्वासन भाजपच्या हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात गुरुवारी दिले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कोविड-19 वरील लस केंद्राच्या सूचनेनुसार सर्वांना दिली जाईल, असेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

मोफत पाणी आणि वीज.. हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

हेही वाचा -मोदी सरकारचे अ‍ॅप 2.5 कोटी लोकांना देणार मोफत कायदेशीर सेवा

शहरातील कोविड - 19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी योजना तयार करण्यात येणार असून शहरातील प्रत्येकाची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी नि:शुल्क करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.

या जाहीरनाम्यात मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, दरवर्षी तीन नवीन महिला पोलीस ठाणी सुरू करणे, महिलांसाठी प्रति किलोमीटरवर एक शौचालय, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या महामारीच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, मोफत 'टॅबलेट्स' देण्याचेही आश्वासन दिले आहे.

दरम्यान, तेलंगणा राज्य सरकारकडून जारी केलेल्या अधिकृत निवेदनात काही नेते येत्या महापालिका निवडणुकांमध्ये अडचणी निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांना विचारणा केली असता, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे, त्यांची नावे सांगावीत, असे उत्तर दिले.

बृहत् हैदराबाद महानगरपालिका (GHMC - जीएचएमसी) निवडणूका १ डिसेंबर रोजी होणार आहेत. या वेळी, भाजप प्रदेशअध्यक्ष आणि खासदार बांदी संजय कुमार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा -निवार चक्रीवादळाचा जोर झाला कमी; आता कर्नाटकच्या दिशेने...

Last Updated : Nov 27, 2020, 2:17 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details