महाराष्ट्र

maharashtra

JP Nadda Meets Ramoji Rao : रामोजी फिल्मसिटीत भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डांनी घेतली रामोजी राव यांची भेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 1:59 PM IST

Updated : Oct 7, 2023, 2:17 PM IST

JP Nadda Meets Ramoji Rao : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांची भेट घेतलीय. नड्डा यांनी X वर या बैठकीची छायाचित्रे शेअर केली. यावेळी त्यांनी रामोजी राव यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, ते एक अग्रणी आणि दूरदर्शी व्यक्ती आहेत. त्यांचं योगदान जगासाठी प्रेरणादायी आहे.

JP Nadda Meets Ramoji Rao
JP Nadda Meets Ramoji Rao

हैदराबाद JP Nadda Meets Ramoji Rao :भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी येथील आरएफसी (रामोजी फिल्म सिटी) मध्ये रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष रामोजी राव यांची भेट घेतली. यासंदर्भात X (पूर्वीचं ट्विटर) वर त्यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर करताना नड्डा म्हणाले की, रामोजी राव हे एक दूरदर्शी व्यक्तिमत्व आहेत. मीडिया आणि चित्रपट क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. यावेळी नड्डा यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी नड्डा तेलंगणाच्या दौऱ्यावर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी जे पी नड्डा काल हैदराबादला आले होते. दक्षिणेत कर्नाटकातील सत्ता गमावल्यानंतर भारतीय जनता पक्ष तेलंगणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. घाटकेसर येथील व्हीबीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी झालेल्या भाजपा प्रदेश परिषदेच्या बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीच्या तयारीच्या सूचना दिल्या. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं नऊ वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीबद्दल पक्षाच्या नेत्यांनी लोकांना सांगावं, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय.

बीआरएस सरकारवर टीका :तेलंगणातील बीआरएस सरकारवर टीका करताना नड्डा म्हणाले की, इयत्ता दहावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्यापासून ते लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत बीआरएस शासन सर्व बाबतीत अपयशी ठरलंय. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळं ३० लाख तरुणांच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळाल्या यावर नड्डा यांनी चिंता व्यक्त केली. या महत्त्वाकांक्षी तरुणांना बीआरएस सरकारकडून कायमची सुटका हवी असल्याचं नड्डांनी म्हटलंय. भाजपा हा देशातील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, जो प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षांशी लढत आहे, असंही नड्डांनी स्पष्ट केलंय.

प्रादेशिक पक्ष आता कौटुंबिक पक्ष बनलेत : नड्डा पुढं म्हणाले की, काँग्रेसनं लोकांच्या प्रादेशिक आकांक्षांकडे दुर्लक्ष केलं. यामुळं प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आरजेडी, जेएमएम, तृणमूल काँग्रेस, डीएमके, एनसीपी, शिवसेना, बीआरएस, वायसीपी हे प्रादेशिक पक्ष आहेत. ते आता कौटुंबिक पक्ष बनले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जगन रेड्डी आणि केसीआर कुटुंबांच्या नियंत्रणाखाली आहेत. केंद्रानं गेल्या नऊ वर्षांत राज्याच्या विकासासाठी ९ लाख कोटी रुपये खर्च केल्याचं नड्डांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Independence Day 2023 : जगप्रसिद्ध 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा
  2. Fire In J P Nadda Program: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आरती करत कळसाला लागली आग; पाहा व्हिडिओ
  3. JP Nadda Mumbai visit : जेपी नड्डा यांनी लालबागच्या राजाला ११ नारळाचे तोरण केले अर्पण, 'असा' राहिला मुंबईचा दौरा
Last Updated : Oct 7, 2023, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details