महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपाच्या संसदीय दलाची बैठक सुरू; तीन राज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीवर चर्चा होण्याची शक्यता - छत्तीसगड

BJP Parliamentary Meeting : भाजपाच्या संसदीय दलाची बैठक सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत तीन राज्यांतील मुख्यमंत्री निवडीवर चर्चा होऊ शकते, असं सांगण्यात आलंय.

BJP Parliamentary Meeting
BJP Parliamentary Meeting

By ANI

Published : Dec 7, 2023, 10:58 AM IST

नवी दिल्ली BJP Parliamentary Meeting : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून भाजपाच्या संसदीय दलाची बैठक सुरू झालीय. यावेळी भाजपा खासदारांनी तिन राज्यात भाजपाला मिळालेल्या बहुमताबद्दल पंतप्रधान मोदींचा सत्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. त्यासाठी या राज्यांतील वरिष्ठ नेत्यांनाही दिल्लीत पाचारण करण्यात आलंय. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे आज सकाळी दिल्लीत पोहोचल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार : संसदेच्या ग्रंथालय भवनात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. पक्षाचे सर्व लोकसभा आणि राज्यसभा सदस्य संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होतात. हे सहसा सत्रादरम्यान दर आठवड्याला भेटतात. सभांमध्ये मोदींसह त्यांचे नेते संसदेतील अजेंडा आणि पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय मोहिमांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतात.

अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय नाही : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीतल मोठ्या विजयानंतर भाजपानं अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालंय. यामुळं केवळ त्यांच्या विरोधी पक्षांनाच नव्हे, तर या राज्यांमध्ये चुरशीच्या लढतीचं भाकीत करणाऱ्या काही मतदानकर्त्यांनाही आश्चर्य वाटत आहे.

भाजपानं तीन राज्यांत मोठा विजय मिळवला : पाच राज्यांचे निवडणूक निकालात विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभव 2024 च्या लोकसभा निवढणूकीत काँग्रेसच्या अपेक्षांना मोठा धक्का आहे. मध्य प्रदेशात जवळपास 20 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. या निवडणुकीतही त्यांना 163 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालंय. तर काँग्रेस 66 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाला 54 आणि राजस्थानमध्ये 115 जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा :

  1. निवडणुकीतील पराभवाचा संसदेत राग काढू नये; पंतप्रधानांचा विरोधकांना टोला
  2. 'लाडली'मुळं मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिव'राज'; पाचव्यांदा भाजपानं कशी मिळवली सत्ता?
  3. छत्तीसगडमध्ये भाजपानं दिला कॉंग्रेसला जोरदार झटका; काय आहेत काँग्रेसच्या पराभवाची कारणे?

ABOUT THE AUTHOR

...view details