पणजी - दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे 25 वर्षांपासून निवडून आलेल्या पणजी मतदारसंघात भाजपने बाबूश मोंसरात यांना उमेदवारी ( BJP Panaji Candidate Atanasio Monserrate ) दिली आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना या भागातून भाजपाने तिकिट दिलेले नाही आहे.
- 'पर्रीकर हे मोठे नेते'
गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, त्यांना दोन पर्याय दिलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर भाजपाकडून तिकिट मिळाल्यावर बाबूश मोंसरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मी माझी तुलना मनोहर पर्रीकरांशी करत नाही आहे. ते खूप मोठे नेते आहेत. सगळे उमेदवार हे पक्षासाठी महत्त्वाचे असतात.
- पर्रिकर यांना अन्य मतदारसंघाचा पर्याय - भाजप
दरम्यान, यावर फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही उत्पल पर्रीकर यांना पर्याय दिला होता. पण त्यांनी पहिला पर्याय नाकारला. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी दिलेला पर्याय मान्य करायला हवा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. उत्पल पर्रीकर पक्षविरोधी कोणताही निर्णय घेणार नसल्याने पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. उत्पल पर्रीकर पक्षविरोधी कोणताही निर्णय घेणार नसल्याने पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.