पणजी- देशासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघात भाजपने स्थानिक आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष सुरू ( Babush Monsrat followers Panji ) केला आहे.
बाबुश यांना पणजी तर त्यांच्या पत्नीला तालिगावमधून भाजपने पणजीतून स्थानिक आमदार बाबुश मोंसरात यांना ( Babush Monsrat get ticket form Panji ) तिकीट जाहीर केले. तर नजीकच्या तालिगाव मतदारसंघातून त्यांची पत्नी महसूलमंत्री जेनिफर मोंसरात यांना तिकीट जाहीर केले आहे. मोंसरात दाम्पत्य हे काँग्रेसमधून 2019 ला भाजपत दाखल झाले होते. मोंसरात दाम्पत्यासोबत भाजपने वाळपाईतून विश्वजित राणे तर पर्यें मतदारसंगातून विद्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा-BJP Candidate Announce Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमदेवारींची यादी जाहीर; पणजीतून मोनसेरात
काँग्रेसकडून लोबो दाम्पत्य
भाजपतून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांना पक्षाने कळणगुट तर त्यांची पत्नी दलियाना लोबो यांना शिवोलीतून तिकीट देण्यात आले आहे. पणजीतून उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. मात्र, पक्षाने त्यांना बिचोलीम येथे उमेदवारी देण्याचे ठरविले होते. मात्र उत्तपल यांनी पक्षाचा हा प्रस्ताव नाकारला आहे. येण्याऱ्या काळात आपण वेगळा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-BJP Candidate Announce Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमदेवारींची यादी जाहीर; पणजीतून मोनसेरात