नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. हॅकर्सनी रविवारी सकाळी त्याचे अकाउंट हॅक ( BJP Chief JP Nadda's Hacked Twitter Account ) करून ट्विटही केले. हॅकर्सनी लोकांना युक्रेनला मदत करण्याचे आवाहन केले होते. तसेच माझे अकाउंट हॅक न झाल्याचेही हॅकर्सनी टि्वटमध्ये म्हटलं.
बिटकॉइन आणि इथरियम या क्रिप्टोकरन्सीद्वारे युक्रेनच्या लोकांना मदत करण्याचे आवाहन हॅकर्सनी केले. त्या लोकांना सध्या मदतीची गरज आहे, असे टि्वटमध्ये म्हटलं होतं. तसेच हॅकर्सनी प्रोफाइलचे नाव बदलून ICG OWNS INDIA केले होते.
टि्वटरकडून जे. पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक रिकव्हर करण्यात आले आहेत. हँकर्सचे ट्विट डिलीट करण्यात आले आहेत. सर्व वादग्रस्त ट्विट काढून टाकण्यात आले आहेत. आता त्यांच्या हँडलवरील शेवटचे ट्विट 2 तासांपूर्वीचे आहे. त्यात त्यांनी उत्तर प्रदेशच्या लोकांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे दिसत आहे.
यांचेही झाले होते ट्विटर खाते हॅक -
मागील काही दिवसांमध्ये ट्वीटर अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या ट्वीटर अकाउंटचा देखील समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या @narendramodi हे ट्विटर अकाउंट हॅक (Narendra Modi Twitter Account Hacked) झाले होते. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे टि्वट हॅकरने केले होते. तीन मिनिटांत बिटकॉइनबाबत दोन ट्विट (Tweets on Bitcoin) करण्यात आले होते. तसेच अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, जगातील सर्वात मोठी कंपन्यांमधील उबर आणि अँपल या कंपन्याची खातीही हॅक करण्यात आली आहेत.
हेही वाचा -PM modi's account hacked: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक ; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा