लखनौ - भाजपा खासदार कौशल किशोर यांच्या सुनेने आत्महत्येचा प्रयत्न केला. एक व्हिडिओ जारी करत अंकिता यांनी हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंकिता यांना रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येपूर्वी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी पतीने आपल्या धोका दिल्याचे म्हटलं. "मी जीव द्यायला जातेय", यासाठी तुम्ही (पती) आणि तुमच्या घरचे जबाबदार आहात, असे अंकिता यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक क्षणाला तुमच्या (पती आयुष) सोबत होते. मात्र, तुम्ही माझ्याकडून सगळं हिसकावून घेतलं. तुम्ही तुमच्या घरी गेलात. मात्र, माझा विचार केला नाही.घरात सिलेंडर नाही. माझ्याकडे पैसै आहेत की नाहीत, मी काही खाल्ले की नाही, घराचे भाडे या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार केला नाही. आता मी तुमच्यापासून खूप दूर जात आहे. आतापर्यंत तुमच्यासोबत होते. ही माझी चूक होती, असे अंकिता यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं.