नवी दिल्ली - अलाहाबादच्या भाजपा खासदार रीता बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( UP Election 2022 ) आपला मुलगा मयंक जोशीला ( Mayank Joshi ) लखनऊ कैंट मतदारसंघातून तिकिट मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला, तयार असल्याचे सांगितले आहे. यासंबंधित त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP President JP Nadda ) यांना पत्र लिहिले आहे.
मंगळवारी रीता बहुगुणा जोशी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या, त्यांचे पुत्र मयंक जोशी 2009पासून पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी लखनऊ कैंट येथून उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. मात्र, पक्ष 'एक परिवार एक तिकीट' हा नियम लागू करत आहे. त्यामुळे मयंकला तिकिट मिळाल्यावर ते स्वत: आपल्या वर्तमान लोकसभा खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, 'मी हा प्रस्ताव भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवला आहे. तसेच नेहमी भाजपासाठी काम करत राहील. पक्ष माझा प्रस्तावाला स्विकार करणे अथवा नाकारणे दोन्ही पर्याय निवडू शकते. मी गेल्या अनेक वर्षांआधीच घोषणा केली होती की, मी निवडणूक लढवणार नाही.