मथुरा: कोरोना संसर्गाचा धोका झपाट्याने वाढत आहे. आता भाजप खासदार हेमा मालिनी यांचे पीए (पर्सनल सेक्रेटरी) जनार्दन शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. (bjp-mp-hema-malini-PA positive) हेमा मालिनी त्यांच्या (MP Hema Malini Corona Test) आठ दिवसांसाठी मथुरा लोकसभा मतदारसंघात लोकांसोबत दौरा करत होत्या. यादरम्यान (Hema Malini's health deteriorated) पीए जनार्दन शर्मा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Hema Malini) आल्यानंतर हेमा मालिनी यांचीही आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जनार्दन शर्मा यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच राहण्याचे आवाहन
खासदार हेमा मालिनी यांचे पीए जनार्दन शर्मा हे सदर बाजारच्या बसंतर पार्क भागात राहतात. सोमवारी सौम्य ताप आल्यानंतर डॉक्टरांनी जनार्दन शर्मा यांची आरटी-पीसीआर चाचणी केली. यादरम्यान त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर जनार्दन शर्मा यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच राहण्याचे आणि घरी वेगळे राहून वेळेवर औषधे घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आरटी-पीसीआर चाचणी करून दिल्लीला रवाना
यादरम्यान खासदार हेमा मालिनी यांनाही सर्दी आणि फ्लूच्या तक्रारी सुरू झाल्या. यानंतर हेमा मालिनी आरटी-पीसीआर चाचणी करून दिल्लीला रवाना झाल्या आहेत. खासदार हेमा मालिनी यांचा कोरोना रिपोर्ट मात्र निगेटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, हेमा मालिनी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या संसदीय मतदारसंघ मथुरामध्ये लोकांसोबत दौरा करत होत्या.