नवी दिल्ली :भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ( Gautam Gambhir ) ' आईएसआईएस काश्मीर' या संघटनेने जीवे मारण्याची धमकी ( Gautam Gambhir received death threats from ISIS Kashmir ) दिली आहे. याबाबतची तक्रार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात केली आहे.
डीसीपी (मध्य) श्र्वेता चौहान ( DCP Shweta Chauhan ) यांनी सांगितले की, माजी क्रिकेटर गौतम गंभीर याला ' आईएसआईएस कश्मीर ' ने जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तपासणी सुरू आहे. गंभीर याच्या निवासस्थान बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
माहितीनुसार, गंभीर याला ई-मेल व्दारे ही धमकी दिली गेली आहे.