महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa BJP MLAs Displeasure : गोव्यात भाजपमध्ये दुफळी.. आमदारांचे नाराजीनाट्य.. राजकीय हालचाली वाढल्या.. - मगोपचा गोव्यात भाजपला पाठिंबा

गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Goa Election Result 2022 ) लागल्यानंतर भाजप सत्तेच्या जवळ पोहोचलेली आहे. सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेतल्याचं भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलं ( MGP Supports BJP In Goa ) आहे. मात्र हाच निर्णय आता गोव्यातील भाजपच्या काही आमदारांना आवडलेला नाही. त्यामुळे गोव्यात भाजपात दुफळी निर्माण झाली ( Goa BJP MLAs Displeasure ) असून, नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

गोव्यात भाजपमध्ये दुफळी.. आमदारांचे नाराजीनाट्य.. राजकीय हालचाली वाढल्या..
गोव्यात भाजपमध्ये दुफळी.. आमदारांचे नाराजीनाट्य.. राजकीय हालचाली वाढल्या..

By

Published : Mar 13, 2022, 8:26 PM IST

Updated : Mar 14, 2022, 1:02 PM IST

पणजी- विधानसभा निवडणुकीत ( Goa Election Result 2022 ) भाजपला बहुमत प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपला बिनशर्त पाठिंबा ( MGP Supports BJP In Goa ) दिला. त्याक्तच 3 अपक्षाच्या पाठिंब्यामुळे भाजप सध्या सुस्थितीत आहे. मात्र मागोपचा पाठिंबा घेण्यावरून भाजपात दुफळी निर्माण झाली ( Goa BJP MLAs Displeasure ) आहे. काही आमदारांनी आपली नाराजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

मी थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलणी केली आहे असे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी ईटीव्ही शी बोलताना सांगितले.

केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपला समविचारी पक्षांची गरज आहे. त्यातच मगो हा भाजपचा पारंपरिक मित्र. याच मगोच्या मदतीने भाजपला आगामी लोकसभा निवडणूक राज्यात जिंकायची आहे. त्यामुळे भाजपकडे तूर्तास पुरेसे संख्याबळ असताना देखील त्यांना सत्तेत सहभागी करून घ्यायचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मानस आहे. मात्र याला राज्यातील काही आमदारांनी विरोध दर्शविला आहे.

विरोधमागची कारणे?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फोंडा, प्रियओळ, शिरोडा, कुडचडे मतदारसंघात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला. यात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये काटे की टक्कर झाली. त्यात भाजपचे उमेदवार अतिशय कमी फरकाने निवडून आले. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांनी याला विरोध केला आहे. त्यातच स्थनिक भाजपच्या मंडळांचाही याला प्रचंड विरोध आहे.

कोणत्या आमदारांचा आहे विरोध?

पर्वरीचे आमदार रोहन खवते, पणजीचे आमदार बाबुश मोंसरात, फोंडयाचे आमदार रवी नाईक, प्रियओळचे आमदार गोविंद गावडे, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, म्हापसाचे जोशुआ दिसुज़ा यांनी मगोला सत्तेत सहभागी करून घेण्याविषयी विरोध केला आहे. यातील फोंडा, शिरोडा आणि प्रियओळ मतदारसंघात काहीशा फरकाने भाजपचे उमेदवार विजयी झाला. याचाच वचपा काढण्यासाठी या आमदारांनी याला विरोध केला आहे.

स्थानिक नेतृत्वाने हात झटकले

मगोला विरोध करणाऱ्या सर्व आमदारांची एक बैठक शनिवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी या आमदारांनी आपली नाराजी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे व्यक्त केली. प्रदेश अध्यक्ष तानावडे यांनीही याबाबत बोलताना सांगितले की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला भाजपात सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे आपण काहीही निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली.

स्थिर सरकार देण्यासाठी आमचा भाजपला साथ- सुदिन ढवळीकर

राज्यात स्थिर सरकार देऊन कोणत्याही पक्षाचे आमदार न फोडून राज्य सुस्थितीत चालण्यासाठी आपण भाजपला साथ दिली आहे. यासंदर्भात आपली भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा झाली आहे आणि त्यांनी मला तसे आश्वासन दिले आहे. म्हणूनच मी भाजपला माझ्या पक्षाचा पाठिंबा दिला आहे. मात्र आम्हाला सत्तेत सहभागी करून घेण्यास विरोध करणाऱ्या आमदार मला बोलत नाही. मी थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलणी केली आहे असे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी ईटीव्ही शी बोलताना सांगितले.

Last Updated : Mar 14, 2022, 1:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details