महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

"ममता बॅनर्जी या राक्षसी संस्कृतीतून आल्यात; म्हणून त्यांना रामाचे वावडे" - ममता बॅनर्जी राक्षसी संस्कृती

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होत्या. यावेळी "जय श्रीराम" म्हणत त्यांना अभिवादन केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर बॅनर्जींवर विविध भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनीही ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ममता या राक्षसी संस्कृतीच्या असून, त्यांच्या रक्तातच दोष असल्याचे वक्तव्य सिंह यांनी सोमवारी केले.

BJP MLA says Mamata belongs to 'demon culture'
"ममता बॅनर्जी या राक्षसी संस्कृतीतून आल्यात; म्हणून त्यांना रामाचे वावडे"

By

Published : Jan 25, 2021, 3:07 PM IST

लखनऊ :उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ममता या राक्षसी संस्कृतीच्या असून, त्यांच्या रक्तातच दोष असल्याचे वक्तव्य सिंह यांनी सोमवारी केले.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होत्या. यावेळी "जय श्रीराम" म्हणत त्यांना अभिवादन केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर बॅनर्जींवर विविध भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

त्या राक्षसी संस्कृतीच्या; त्यामुळे रामावर राग स्वाभाविक..

सुरेंद्र सिंह हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की "ममता यांच्या डीएनएमध्ये दोष आहे. त्या राक्षसी संस्कृतीमधून आल्या आहेत. कोणताही राक्षस रामावर प्रेम करु शकत नाही. बॅनर्जी या भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती आहेत. त्यामुळे, त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक आहे." पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या सदस्यांनी घडवलेल्या हिंसाचारातून त्यांच्या राक्षसी वागण्याचे आणखी पुरावे मिळतात, असा आरोपही सिंह यांनी यावेळी केला.

दीदींना पाठवली रामायणाची प्रत..

शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर देशभरातून भाजप नेते ममतांवर टीका करत आहेत. सिंह यांच्यासोबत मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि आमदार रामेश्वर शर्मा यांनीदेखील ममतांवर टीका केली. यासोबतच, त्यांनी ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. दीदी रामायणाचे वाचन करतील आणि प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील, अशी अपेक्षा आहे. तसेच इथून पुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत, असे रामेश्वर शर्मा यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :'दीदींना 'अल्लाह हू अकबर' चालतं, तर 'जय श्री राम' जयघोषाचा त्रास का?'

ABOUT THE AUTHOR

...view details