महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक 2024 : हरियाणामध्ये भाजपाचा जातीय समीकरणावर भर, निवडणुकीची तयारी जोरात - मुख्यमंत्री पदाची माळ

BJP Mission 2024 : विधानसभा निवडणुकीत भाजपानं तीन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यात भाजपानं जातीय समीकरणावर भर देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उमेदवार दिले आहेत. त्याचा परिणाम हरियाणातील निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BJP Mission 2024
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 11:42 AM IST

चंदीगड BJP Mission 2024 : देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला तीन राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आलं आहे. मात्र या तीनही राज्यात भाजपानं आपले जुने चेहरे हटवून नवीन चेहऱ्यांना संधी देत मुख्यमंत्री पदाची माळ घातली. त्यात पक्षानं जातीय समीकरणांची विशेष काळजी घेतली आहे. भाजापानं जातीय समीकरणांवर भर देत तीनही राज्यात उपमुख्यमंत्री पदावर विविध जातींच्या उमेदवारांना संधी दिली.

उपमुख्यमंत्री पदावर जातीय समीकरण :भाजपानं मध्यप्रदेशात ओबीसी, राजस्थानमध्ये ब्राह्मण आणि छत्तीसगडमध्ये आदिवासी नेत्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. या राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही करण्यात आले. त्यातही भाजपानं जातीय समीकरणांवर विशेष भर दिला आहे. राजस्थानमध्ये एक राजपूत आणि एका दलिताला उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. मध्यप्रदेशात एक ब्राह्मण आणि एका दलिताला उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. तर छत्तीसगडमध्ये ओबीसी उमेदवाराला उपमुख्यमंत्री करण्यात आलं.

हरियाणातील जाट व्होट बँकेवर डोळा :विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपानं तीन राज्यात जातीय समीकरणं मांडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत. त्यामुळं देशातील सगळ्याच पक्षातील जातीय समीकरणं बदलली आहेत. भाजापानं आपल्या या खेळीतून अनेक घटकांना खिळखिळं केलं आहे. भाजपाच्या या खेळीचा परिणाम हरियाणाच्या जाट व्होट बँकेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरियाणातील जाट व्होट बँक भाजपाची मानली जात नाही. मात्र जातीय समीकरणावर भर देऊन भाजपा जाट व्होट बँक आपल्याकडं वळवण्यात यशस्वी होऊ शकते. त्यामुळं हरियाणातील जाट व्होट बँकेवर भाजपाचा डोळा असल्याचं भाजापाच्या विविध खेळीतून दिसून येते.

हरियाणात भाजपा खेळणार खेळी :हरियाणातील जातीय समीकरण सोडवण्याच्या भाजपाच्या खेळीचा फायदा होईल का ? अशी चर्चा सध्या सुरू आहे. हरियाणात ब्राह्मण, बनिया आणि शीख समाजाची तीस टक्के व्होट बँक आहे. ओबीसी (अहिर आणि यादव) वर्गाची 24 टक्के व्होट बँक आहे. अनुसूचित जातींची 21 टक्क्यांहून अधिक व्होट बँक आहे. जाटांची 17 टक्क्यांहून अधिक व्होट बँक आहे. तर उर्वरित गुर्जर आणि इतर समुदायांची आहे. त्यामुळं हरियाणातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला जातीय समीकरणाचा फायदा होणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

तीन राज्यांचा परिणाम होणार हरियाणा निवडणुकीवर :भाजपानं तीन राज्यात सत्ता स्थापन करुन जातीय समीकरणांवर आधारित मुख्यमंत्री पदाचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळं याचा परिणाम आगामी हरियाणा विधानसभा आणि लोकसभेवर होणार आहे. राजकीय विश्लेषक धीरेंद्र अवस्थी यांनी "ब्राह्मण भाजपाला मतदान करतात, पण भाजपा त्यांना त्याबदल्यात काहीच देत नाही असा केला जातो. मात्र तीन राज्यात ज्या पद्धतीनं एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ब्राह्मण बनवले गेले, त्यावर आधारित समज भाजपानं मोडीत काढला आहे. आगामी काळात हरियाणात त्याचे फायदे मिळवून देण्यासाठी भाजपा नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करेल असं ते म्हणाले. प्राध्यापक गुरमीत सिंग यांनी, "भाजपानं तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नियुक्त करून जातीय समीकरण सोडवलं आहे. त्यामुळे विरोधकांसाठी जातीय राजकारणाचा मुद्दा कमकुवत झाला आहे. भाजपानं अनेक वर्गांची व्होट बँक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. बडगुजरांवरील आरोपानंतर भाजपाचे मोठे नेते सलीम कुत्तासोबत? सुषमा अंधारेंनी दाखवला फोटो
  2. कांद्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी घेतली पियुष गोयल यांची भेट
  3. कोण आहेत हे भाजपा खासदार, ज्यांच्या पासवर गेलेल्या तरुणांनी लोकसभेत गोंधळ घातला

ABOUT THE AUTHOR

...view details