महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'राहुल गांधींनाच समज कमी, त्यांनी अमेठीच्या जनतेचा केला अपमान'

'राहुल गांधींचे असे म्हणणे चुकीचे आहे की. केरळमधील लोकांपेक्षा अमेठी लोकांमध्ये समज कमी आहे. माझा विश्वास आहे की, अमेठीच्या लोकांमध्ये समज कमी नाही. उलट राहुल गांधींमध्ये समज कमी आहे,' असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. येथे बोलताना 'विकासासाठी काहीच केले नाही' तरीही शहरातील लोकांनी गांधी यांना 15 वर्षे अफाट प्रेम दिले, असे त्या म्हणाल्या.

By

Published : Mar 6, 2021, 5:37 PM IST

Updated : Mar 6, 2021, 6:53 PM IST

Smriti Irani attacks Rahul
स्मृती इराणींचा राहुल गांधींवर हल्लाबोल न्यूज

अमेठी (उत्तर प्रदेश) - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर केरळमधील मतदारांशी तुलना करून अमेठीतील जनतेचा 'अपमान' केल्याचा आरोप केला. अमेठीच्या खासदार इराणी यांनी तिलोई येथे बसस्थानकाची पायाभरणी केली. येथे बोलताना 'विकासासाठी काहीच केले नाही' तरीही शहरातील लोकांनी गांधी यांना 15 वर्षे अफाट प्रेम दिले, असे त्या म्हणाल्या.'राहुल गांधींचे असे म्हणणे चुकीचे आहे की. केरळमधील लोकांपेक्षा अमेठी लोकांमध्ये समज कमी आहे. माझा विश्वास आहे की, अमेठीच्या लोकांमध्ये समज कमी नाही. उलट राहुल गांधींमध्ये समज कमी आहे,' असे त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

केरळच्या तिरुअनंतपुरम येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात गांधींनी अलीकडेच म्हटले होते की, 'सुरुवातीच्या 15 वर्षांमध्ये मी उत्तरेकडील खासदार होतो, मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय लागली होती. माझ्यासाठी केरळला येणे खूपच स्फूर्तीदायक होते. अचानक मला आढळले की येथील लोक ज्या विषयांबाबत स्वारस्य ठेवतात, ते केवळ वरवरच्या पद्धतीने नव्हे तर, अधिक तपशीलात जाऊन.' त्यांच्या बोलण्यावर हा अमेठीच्या जनतेचा अपमान असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

गांधी घराण्यावर हल्ला चढवत इराणी म्हणाल्या की, 'देशातील एका राजकीय कुटुंबाने अमेठीवर 30 वर्षे राज्य केले. पण त्याच्या विकासाचा विचार कधीही केला नाही. अमेठी विकसित करण्याऐवजी आणि येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याऐवजी त्यांनी येथे त्यांचे गेस्ट हाऊस बांधण्याचे काम सुरू ठेवले,' असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -भारतीय बनावटीची कोविड लस सोमालियाला रवाना

2020 मध्ये 23,800 शेतकर्‍यांना एमएसपीचा फायदा

शेतकऱ्यांविषयी बोलताना इराणी म्हणाल्या की, 'गांधींचा पक्ष सत्तेत असताना 2013 मध्ये केवळ 800 शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळाला होता. तर, 2020 मध्ये येथे तब्बल 23,800 शेतकर्‍यांना येथे एमएसपीचा फायदा झाला.'

विकास योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचत असल्याचे इराणी म्हणाल्या. पंतप्रधान किसान सन्मान निधीने शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले असून आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला योजना आणि सौभाग्य योजनेचा थेट फायदा नागरिकांना झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा -तापसीच्या ट्विटवर कंगना म्हणाली; 'तू हमेशा सस्तीही रहेगी'

Last Updated : Mar 6, 2021, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details