मदुराई : कॉमेडीयन वेंकटेशन यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यात त्यांच्या पत्नीसह इतर पाच जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कॉमेडीयन वेंकटेशन तसेच त्यांची पत्नी यांच्यात सतत वादामुळे हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या ह ल्ल्यात कॉमेडीयन वेंकटेशन यांचा ड्रायव्हर, तसेच भाजपच्या सदस्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पती-पत्नीमध्ये मतभेद :व्यंकटेशन आणि त्यांच्या पत्नीमध्ये मतभेद असून, या प्रकरणाचा न्यायालयात खटला सुरू आहे. वेळोवेळी पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्याचवेळी, पत्नी भानुमतीला याचा राग आला होता. तिने ज्याच्याशी प्रेमविवाह केला होता तो तिचा पती अफेअरचा खटला न्यायालयात चालवत होता. तसेच तो सोशल मीडियावर इतर महिलांना डेट करत होता. कॉमेडीयन वेंकटेशन थंबल थनाठीनगरच्या थर्ड स्ट्रीट येथे राहतात. करुप्पासामी कुथागैथारर, तमिळ चित्रपट आणि खाजगी टेलिव्हिजनवर आयोजित कॉमेडी शोमध्ये स्पर्धक म्हणून ते काम काम करीत होते. व्यंकटेशन त्यांची पत्नी भानुमती तसेच त्यांना एक छोटी मुलगी आहे. तसेच, ते फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सक्रिय आहे.
व्यंकटेशनचे पाय तोडण्याची योजना :या प्रकरणात भानुमतीने पतीला मारहाण करणे, त्याचे पाय तोडणे आणि घरात कोंडून ठेवण्याची योजना आखल्याचे दिसून आले आहे. भानुमतीने व्यंकटेशनच्या कार ड्रायव्हरमार्फत राजकुमारशी संपर्क साधला. नंतर भानुमतीने राजकुमारला एक लाख रुपये देऊन व्यंकटेशनचे पाय तोडण्याची योजना आखली होती. मात्र, त्यांची ही योजना फसली. त्यामुळे, तिने चुलत भाऊ आणि भाजप एससी टीम राज्य कार्यकारिणीचे सदस्य वैरामुथू यांना याबद्दल सांगितले.
दोन भाजपच्या अधिकाऱ्यांची भेट :यानंतर वैरामुथू यांनी भानुमतीला मदत करणार असल्याचे सांगितले तसेच त्याने दोन भाजपच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. कॉमेडियन व्यंकटेशन हे द्रमुक समर्थक आहेत. ते त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर भाजप, पंतप्रधान, अमित शहा आणि अण्णामलाई यांच्याविरोधात विविध कमेंट पोस्ट करत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असे त्यांना सांगितले.