महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VK Singh ON Sushma : लोकप्रतिनिधी असण्याचा अर्थ मी सुषमा स्वराज यांच्याकडून शिकलो - व्ही. के. सिंह - sushma swaraj 3rd death anniversary

सुषमा स्वराज यांच्याकडून मला लोकप्रतिनिधी असण्याचा अर्थ कळला, असे उद्गार केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग (निवृत्त) यांनी काढले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ( sushma swaraj 3rd death anniversary ) सोशल मीडियावर 2014 च्या एक घटनेची आठव त्यांनी सांगितली.

VK Singh
VK Singh

By

Published : Aug 6, 2022, 1:46 PM IST

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टी दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ( sushma swaraj 3rd death anniversary ) त्यांच्या भावपूर्ण आठवणी सांगून लोकप्रतिनिधी होण्याचा अर्थ सुषमा स्वराज यांच्याकडून शिकला, असे सांगितले. मोदी सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम केलेले सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2014 च्या घटनेची आठवण करून दिली. "ही 2014 ची गोष्ट आहे, तुम्हाला आठवत असेल की, त्यावेळी 39 भारतीय नागरिक इराकमधील बेपत्ता झाले होते.

त्यावेळी ISIS सोबत युद्ध सुरू होते. पोलिस, कायदा आणि सुव्यवस्थेचे मदत मिळणे अशक्य होते. या संकटात आमच्या हरवलेल्या देशबांधवांशी संपर्क होऊ शकत नव्हता. ते ISIS च्या कैदेतच कुठेतरी असल्याची माहिती मिळाली होती, परंतु तीही खात्रीलायक माहिती नव्हती. आमचे नागरिक जिवंत आहेत की मारले गेले आहेत याबाबत ठोस माहिती मिळत नव्हती.

'आमच्या देशबांधवांचे भारतातील कुटुंबीय त्यांना शोधून काढण्याची विनंती करत होते. सुषमाजींनी त्यांची विनंती ऐकली आणि म्हणाल्या की, हे आपल्या देशातील लोक आहेत. ते जिवंत असल्याची पुसटशी माहिती असेपर्यंत त्यांचा शोध सुरूच ठेवायचा असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना जिवंत परत आणू शकलो तरच आपण यशस्वी होऊ. मारले गेले असल्यास त्यांचे मृतदेहही तिथे राहू न देता ते मायदेशी आणायचेच. तेव्हाच त्यांच्या नातेवाईकांना समाधान मिळू शकेल, असे सुषमाजी तेव्हा म्हणाल्या होत्या, असे व्ही. के. सिंह यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांच्या बोलण्याचा तपशीलवार संदर्भ देत सिंह यांनी लिहिले की, 'सुषमाजींनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चेची प्रक्रिया सुरू केली. आमचे लोक ISIS च्या बंदिवासात आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला लावले जात असल्याचे संकेत मिळू होते. 10 जुलै 2017 रोजी इराकच्या पंतप्रधानांनी मोसुल स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. त्याच दिवशी सुषमाजींनी मला फोन करून सांगितले की जनरल साहेब, तुम्ही इराकमध्ये जा आणि आपल्या नागरिकांचा शोध घ्या. मी इंदूरला होतो, दिल्लीला परत आलो आणि रात्री एअरबिलला निघालो. इराकी कुर्दींच्या ताब्यात असलेल्या एरबिलहून मोसुलला पोहोचणे सोपे होते. पण मी तेथून मोसुलला जाऊ शकलो नाही, कारण तेव्हाही मोसुलमध्ये लढाई सुरू होती आणि इराकी सैन्याने जाऊ दिले नाही.

सिंह यांनी पुढे वर्णन केले की, ते किती कठीण होते. ते नंतर मोसुलला पोहोचले जेथे तो दिवसा भारतीयांचा शोध घेत असे आणि रात्री आपल्या सहकाऱ्यांसह एका छोट्या खोलीत जमिनीवर झोपत असे. सुषमा स्वराज यांच्या देशवासियांप्रती असलेल्या भावनेचा संदर्भ देत व्ही. के. सिंह पुढे म्हणाले, 'सुषमाजी माझ्या संपर्कात राहायच्या आणि माझ्याकडून माहिती घ्यायच्या आणि आम्हाला प्रोत्साहन द्यायच्या. शेवटी आम्हाला आमचे लोक मिळाले, परंतु आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. त्यावेळी सुषमाजींनी ज्या दयाळूपणे मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले ते पाहून मला लोकप्रतिनिधी म्हणजे काय ते समजले. लोकप्रतिनिधी असण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही समाजापेक्षा वर आला आहात. ती सर्व जबाबदारी, ते भावनिक नाते, लोकांच्या समस्या समजून घेणे या सर्व गोष्टी तुमच्या खांद्यावर येतात, ज्यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीचा तोल सुटू शकतो.

जे सुषमाजींना ओळखतात ते तुम्हाला सांगतील की त्यांच्यासारखी नम्र, आनंदी आणि शुद्ध प्रतिमा असलेल्या व्यक्ती फार कमी आहेत. सुषमा स्वराज यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, 'माझं भाग्य आहे की त्यांच्या सावलीत मी जनसेवेच्या या मार्गावर चालायला शिकलो. त्यांचा आदर्शाप्रमामे मला काही राहता आले पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे, हेच माझे यश असेल. दिवंगत सुषमा स्वराज जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

हेही वाचा -Governor Koshyari controversial statement : मोदींपूर्वी भारतीयांना जगात जो मान.. या विधानामुळे राज्यपाल पुन्हा ठरले टीकेचे धनी

ABOUT THE AUTHOR

...view details